
नांदेड| आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने प.पू.गुरुदेव श्री. श्री. रविशंकरजी यांच्या आगमनानिमित्त आयोजित ‘रंगोत्सव’ या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 12 फेब्रुवारी रोजी सायं. 5.30 वाजता संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण शहरातील 72 शाळांमधून 3643 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी एकूण 40 पारितोषिके विविध गटासाठी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक व रंगोत्सवचे आयोजक संदीप निखाते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर सौ. जयश्री पावडे व प्रा.चंद्रकांत पोतदार हे उपस्थित होते. प्रा. चंद्रकांत पोतदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बालचित्रकांरांच्या भावविश्वांनी आम्हा परिक्षकांना खूप शिकायला मिळाले, त्यांनी एक आसीम उंची गाठली होती असे उद्गार काढले.

यावेळी राजीव अंबेकर व इतर मान्यवरांनीही आपापली मनोगते व्यक्त केली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पोतदार कॉलेजचे संचालक प्रा. चंद्रकांत पोतदार, एमजीएम फाइन आर्ट कॉलेजचे नासेर, विजयसिंह ठाकूर, राजीव अंबेकर, अनिल कुंठेकर, विक्रांत हाटकर, प्रदीप सूर्यवंशी, इत्यादी प्रतिथयश चित्रकला शिक्षक लाभले होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक वनिष्क कुर्हे, सविता हल्लाळे, पूजा अनिल गंगाखेडकर, संध्या संगेवार, डॉ. अर्चना कासराळीकर, अनुराधा पांडे, दिपाली बिरादार, रागेश्री जोशी, प्रशांत गजुळा, विनय पावडे, नरेंद्र रत्नपारखी, पारस पोकर्णा, दयानंद माने, मंगेश खानापुरे आदींनी परिश्रम केले.

