
वडगाव /पोटा।हिमायतनगर तालुक्यासह वडगाव/ पोटा परिसरामध्ये क्रांतीसिंह संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये व आनंदात पारंपारिक वाद्य व वेशभूषेमध्ये पार पडली अनेक समाज बांधवांनी या क्रांतिसिंह संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

पोटा परिसरामधील पोटा तांडा, बळीराम तांडा, काडली तांडा, कोका नाईक तांडा, भोडणी तांडा, दाबदरी तांडा ,लष्कर तांडा ,वाईवाडी तांडा, टाकराळा तांडा दरेगाव तांडा आधी तांड्यातील नागरिकांनी महिलांनी युवकांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी केली.

जयंती साजरी करताना पारंपारिक बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये व पारंपारिक वाद्याच्या गजरात अनेकांनी या संतांना अभिवादन केले. क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील गोलाल डोडी तालुका गुटी जिल्हा अनंतपुरम या गावी झाला. आता या गावात सेवालाल गड असे नाव पडले आहे. संत सेवालाल महाराज लढवय्या बंजारा माझातील सद्गुरु होते त्यांनी सामाजिक धार्मिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले.

भरकट जाणाऱ्या समाजाला दिशा देऊन वाईट चाली रूढी परंपरा भोळ्या बावड्या समाजाची होणारी फसवणूक अंधश्रद्धा ढोंगी बुवाबाजी बुवाबाजी आदी बाबीवर कडाडून टीका करून समाजाला दिशा देण्याचे काम केले. या क्रांतीसिंह संत सेवालाल महाराज यांची आज मोठ्या आनंदाने व उत्साहाने वडगाव पोटा परिसरामधील अनेक शासकीय निम शासकीय कार्यालयात व तांड्यामध्ये जयंती साजरी करण्यात आली.

