नांदेड| धर्मांतरण बंदी कायदा यावा आणि लव-जिहाद विरोधी कायदा यावा यासाठी नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांना हिंदु जनजागृती समिति तर्फे निवेदन सादर करण्यात आले आहे.
राज्यात दिवसेंदिवस धर्मांतराची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. आर्थिक आमिष, प्रलोभने, भावनिक जाळे आणि बळजोरी आदी अनेक माध्यमांतून गरीब आणि असाहाय्य हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत आहे. त्यातच श्रद्धा वालकर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर, लव्ह-जिहादच्या घटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावतीसह राज्यभरात उघडकीस आल्या आहेत. एकूणच राज्यात दिवसेंदिवस ‘लव्ह-जिहाद’ ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. यामध्ये हिंदु युवतींचे भयंकर शोषण केले जाते.
या अत्यंत गंभीर समस्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रात ‘धर्मांतरण बंदी कायदा’ आणि ‘लव्ह-जिहाद विरोधी कायदा’ लागू करावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीतर्फे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन देवून करण्यात आली. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. राधाकृष्ण पांपटवार, श्री. सोपान सोनटक्के, श्री. संजय बोतकुलवार आणि श्री. बजरंग रघोजीवार हे उपस्थित होते.