
उस्माननगर। श्री दत्तात्रय देवस्थान उस्माननगर ( मोठी लाठी )ता.कंधार येथे आनंत ब्रम्हांडनायक भगवान दत्तात्रय प्रभू यांच्या कृपा आशिर्वादाने व श्री श्री परमपूज्य महास्वामी मोक्ष वाशी १०८गंभीरबन महंत महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व श्री श्री गुरुवर्य परमपूज्य श्री संत अमृतबन महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री श्री १०८महंत परमपूजनीय मधुबन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व श्री श्री परमपूज्य वंदनीय गुरुवर्य श्री संत शंकर बन महाराज यांच्या छत्रछायेखाली तसेच सर्व साधुसंत महंत यांच्या उपस्थितीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त निज आत्मबोधग्रंथ ज्ञान चर्चा सोहळा आणि भव्य कीर्तन सोहळा तसेच माहूरगड पदयात्रा सांगता समारोप सोहळा दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केला आहे.

सकाळी सहा वाजता दत्तप्रभूचा अभिषेक व महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे यावेळी भागवताचार्य महंत प्रभाकर बाबा कपाटे यांचे दुपारी भव्य कीर्तन सोहळा होईल दुपारी चार वाजल्या पासू आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

सायंकाळी सहाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील चित्राची भव्य मिरवणूक सर्व साधू संत महंत अतिथी व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले आहे रात्री नऊ वाजता नीच आत्मबोध ग्रंथ ज्ञान चर्चा सोहळा नंतर रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंत महापूजा भजनाचा कार्यक्रम व पहाटे वीस फेब्रुवारी काकडा आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आयुष्य लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक संत अवधूत बन गुरु शंकर बन महाराज यांनी केले आहे.

