
लोहा| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांच्या पुढाकाराने लोह्यात मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. यात चारशे जणांची तपासणी व १७० चष्मे वाटप करण्यात आले. युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी मोजक्यात भाषणात जबरदस्त फटके बाजी केली.जिल्हाप्रमुख आनंदराव बोढारकर यांची उपस्थिती होती.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या करण्यात हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर होते.यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटमवार, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकादम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्कर पवार, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार, यासह मान्यवर उपस्थित होते

जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांनी मुख्यमंत्रीयांच्या कार्याचा गौरव केला युवा नेते प्रवीण पाटील यांनी नामोउल्लेख न करता जे आले नाहीत. त्यांनाही योग्य वेळी आणू असे सांगून मोजक्याच भाषणात खुप काही फटकेबाजी केली. शिवसेना शहर संघटक संदिप पवार,शहर समन्वय संतोष शेंडगे, तालुका संघटक प्रभाकर राऊत, उपशहरप्रमुख माधव राठोड, सुनील रेठेवार, मकरंद पाटील पवार यांच्या सहित मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. डाॅ. अमृता ऋषीकेश माहेश्वर व त्यांच्या टीमने। नेत्र तपासणी केली यात ४००जणांची मोफत नेत्र तपासणी व १७०जणांना चष्मे दिले तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांच्या लोकोपयोगी शिबिराचा लोकांना खूप फायदा झाला सूत्रसंचालन वैजेनाथ पांचाळ यांनी तर आभार शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी मानले.

