
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर ता. कंधार सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तरुण तडफदार युवा कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे तालुका युवा सरचिटणीस संजय ( रुद्र) रामकिशन वारकड यांची तर व्हा.चेअरमण म्हणून कांजाळातांडा येथील ज्येष्ठ नागरिक गणू मामा जाधव यांची बिनविरोध निवड सर्वानमते करण्यात आली.

कंधार तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी उस्माननगर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अखेरपर्यंत चुरशीची झाली.उस्माननगर सोसायटीच्या १३ जागेसाठी दोन फेब्रुवारी 2023 रोजी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात मतदानात प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक माजी चेअरमन तथा माजी सरपंच तुकाराम वारकड गुरुजी, तेलंगवाडी चे सरपंच तालुका उपाध्यक्ष भाजपा सुरेश मामा बास्टे, वैजनाथ पाटील घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या तेरापैकी तेरा जागेवर प्रचंड मताने निवडून येऊन यश मिळविल.

तर विरोधी पॅनलला कुठेही खाते खोलता आले नाही. उस्मान नगर सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत निवडून आल्यानंतर चेअरमन पदाच्या निवडणुकीत तारीख १३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्याने चेअरमन पदासाठी एकमेव पॅनल असल्यामुळे सर्वांनुमद बिनविरोध निवड प्रक्रिया पार पाडली.

यामध्ये रूद्र ( संजय) रामकिशन वारकड यांची तर व्ह.चेअरमन म्हणून ज्येष्ठ नागरिक गणू शामा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर आडवे बालाजी विश्वनाथ , काळम अशोक गुणाजी, घोरबाड बुद्धाजी संभाजी ,डांगे गोविंद रामा , देशमुख प्रदीपकुमार विनायकराव , भोंग देवराव शेषराव ,लोहकरे माधव दादाराव, वारकड माधव सटवाजी ,मोरे राजेश्वर , संभाजी ईसादकर यांची निवड झाली.

नवनियुक्त सोसायटीच्या सभासद सदस्यांची गावातून प्रमुख रस्त्याने ढोल ताशाच्या निनादात फटाके फोडून गुलाल उधळत मिरवणूक करण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी सर्व सभासद चेअरमनचे सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

