
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील कामठा( बु.) येथील एका बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या घटनेतील आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायालय नांदेड यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि.१३ फेब्रुवारी रोजी दुपारी अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु) येथील एका बालिकेस आरोपी राहुल संजय इंगोले याने चॉकलेटचे आमिष दाखवून गावातील बस स्टॅन्डकडे जाणाऱ्या रोडवरील पुलाखालील पाईपमध्ये नेऊन मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये पोक्सो अॅक्ट प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रोपीस अर्धापूर पोलीसांनी अटक करुन बुधवारी राहुल संजय इंगोले अर्धापूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अर्धापूर पोलिसांनी दिली आहे, या घटनेचा तालुक्यात सर्व स्तरातून निषेध केला जात आहे,याप्रकरणी पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे करीत आहेत.

