
हदगाव, शे.चांदपाशा| गेल्या 14वर्षा वर्षापासून प्रलंबीत असलेला व राजकीय दृष्ट्या दुर्लक्षीत असलेल्या हदगाव तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत म्हत्वाच ठरणार वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 850 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वर्धा- नांदेड नवीन रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी चिन्हे सध्या तरी दिसु लागली आहेत….

केंद्र सरकारने 2023 या वर्षातील अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी आणि रेल्वेच्या इतर कामांसाठी 13 हजार 536 कोटींचा निधी दिला आहे. हा निधी महाराष्ट्राला मिळालेला आता पर्यंतचा सर्वात मोठा निधी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ – मराठवाड्या ला जोडणारा बहुप्रतिक्षीत वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग पूर्णत्वाकडे जाण्यासाठी नादेड व हिगोली जिल्ह्यातील गावाच्या रेल्वे स्टेशनचा विकास होणार आहे.

14 वर्षांपासून प्रलंबित…..
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे उद्घाघाटन तात्कालिक रेल्वेमंञी लालु प्रसाद यादव यांनी केले होते हा प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबीत आहे. सदर रेल्वे मार्गाचे काम 40 टक्के राज्य शासन व 60% केद्र शासनाचा वाट्याने हा प्रकल्प पूर्ण होत आहे. हा मार्ग पूर्ण होण्यास 2026 वर्ष उजाडणार असे वाटत असताना अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याने या मार्गाच्या कामाला पुन्हा गती येईल, अशी शक्यता आहे. या बाबतीत मराठवाड्यातील आमदार खासदार यांनी जर या प्रकल्प मध्ये अधिक लक्ष दिल्यास रेल्वेमार्गच्या कामाला गती येणार आहे कटु सत्य आहे.

284 किलोमीटरचे अंतर
वर्धा ते नांदेड या रेल्वेमार्गाचे अंतर 284 किमी इतके आहे. तर वर्धा ते नादेड पर्यत हा मार्ग पूर्ण झाल्यास विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक यांच्यासाठी सोयीचे होणार असून, वाहतुकीच्या दृष्टीकोनातून सुलभता येणार आहे. हा प्रकल्प नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

केंद्र शासनाने अर्थसंकल्प मध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध रेल्वे स्टेशन व रेल्वे लाईन व इतर कामांकरिता मोठी तरतूद केली आहे. वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी 850 कोटी मंजूर केले असून, वर्धा लोकसभा क्षेत्रातील पाच रेल्वे स्थानकाच विकास होणार आहे माञ नादेड जिल्ह्यातील हदगाव हिगोली नादेड तालुक्यातील किती रेल्वे स्थानकाचा. विकास होईल याची माहीती मिळाली

आमदार व खासदार यांना या बाबतीत वेळ नाही …!
हदगाव हिगोली नादेड जिल्ह्यातील गावांना या नवीन रेल्वे मार्गाचा फायदा होणार माञ या भागातील खासदार व आमदार यांनी गेल्या 14वर्षात स्थानिक पातळीवर नागरिकाशी कधी संवाद साधलेला नाही. या बाबतीत हिगोली लोकसभाचे खा.हेंमत पाटील यांचेशी गेल्या आठवड्यापासुन संपर्क सधायच प्रयत्न केला आसता नेहमी प्रमाणे त्यांच्याशी संपर्क होत नाही त्यांच्या स्विय सह्य्याकांना या बाबतीत माहीती खासदार कडुन घ्या किवा माझ संपर्क तरी करुन दिया अशी विनंती केल्यावर ही वर्धा -नादेड या रेल्वे प्रकल्पच्या बाबतीत माहीती उपलब्ध होत नाही. तसेच स्थानिक हदगाव विधान सभाक्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकरांच्या बाबतीत हाच अनुभव येत आहे हे आवर्जून उल्लेख क करावा लागेल.

