हिमायतनगर। शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्या घेऊन अ.भा.किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)च्या वतीने दिनांक १५ फेब्रुवारी रोजी हिमायतनगर तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला.
देश स्वतंत्र्याच्या ७५ व्या वर्षात वाटचाल करत असताना व अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना,देशात आजही आराजकता,महागाई,बेरोजगारी, शेती क्षेत्रावरील महागाईचे संकट वाढल्यामुळे गोरगरिबांच्या जगण्यावर महागाईच्या भस्मासुरांनी विळका घातला आहे. केंद्रातील मोदी व राज्यातील शिंदे सरकारच्या जनविरोधी व मालक धारजिना धोरणामुळे या समस्या निर्माण होत आहेत. शेतीला सिंचनाची हमी नसल्याने बेरोजगारांना नोकरीची हमी नसल्याने तसेच मजूर वर्गाला कामाची आम्ही नसल्याने ग्रामीण जनता सैरभैर झाली आहे. बी -बियाणे, खते, गॅस, पेट्रोल, डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गग्नाला भिडले आहेत. त्यात जगावे कसे हा प्रश्न सामान्य जनतेसमोर निर्माण झाला आहे. गरीब जनता निराशेच्या गर्दीत लोटली जात आहे.या धोरणा विरोधात शेतकरी शेतमजूर कामगारांनी हिमायतनगर तहसीलवर धडक मोर्चा काढला होता.
हिमायतनगर तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करा, वर्षामध्ये २०० दिवस काम व सातशे रुपये दर दिवशी मजुरी देऊन जॉब कार्डचे वाटप करा. निराधार विधवा परितक्त्या वृद्ध भूमिहीन दिव्यांगांना मानधनात वाढ करून महिना सहा हजार रुपये करा. निराधार यांना उत्पन्नाची अट रद्द करा उत्पन्न प्रमाणपत्रा साठी दोन हजार रुपये लाच घेतली जात आहे या लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करा. पी. एम. किसान सन्मान योजनेची रक्कम वाढवून वर्षाला १२०० रुपये करा. भूमिहीन मजूरांना या योजनेत सामावून त्यांनाही पेन्शन लागू करा. वन हक्क कायदा २००६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.
कसेल त्याची जमीन या नैसर्गिक न्यायाने जमीन पट्याचे वाटप करा. नवाटी, गायरान जमीन वहीती करणाऱ्या शेतकऱ्यांना बँक कर्ज,विहीर व विजेची सोय मोफत करा. ग्रामीण व शहरी भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात वस्ती वाढ योजना मोठ्या प्रमाणात राबवा.शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात वाढ करून ते सहा हजार रुपये करा व त्यांना कायमस्वरूपी कामगारांचा दर्जा द्या. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना वेतन द्या.आरोग्य विभागात कोरोना काळात मोलाचे काम करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत सामावून घेऊन त्यांना वेतन वाढ द्या. नोंदणी करत बांधकाम कामगारांना घरकुलाचे वाटप करा व त्यांना ग्रामपंचायत व नगरपंचायत स्तरावर विना विलंब अनुभव प्रमाणपत्राचे वाटप करा. जनविरोधी वीज विधेयक बिल वापस घ्या.तसेच संभाव्य विजेची भाव वाढ रद्द करा. पैनगंगा नदीवरील प्रस्तावित वीज प्रकल्प सुरू करा. शेतीला सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय करा.
नगरपंचायत हिमायतनगरला नगरपरिषदेचा दर्जा द्या. ४३ नंबर साठी चारशे रुपये घेऊन अडवणूक होत आहेत ते मोफत द्या. मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्या. अन्नसुरक्षा योजनेतील शेतकरी लाभार्थ्यांना मिळणारे धान्य पूर्वज वाटप करा.आदी मागण्या मोर्चामध्ये करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.अर्जुन आडे, सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड,किसान सभा तालुका अध्यक्ष कॉ.दिगांबर काळे,सिटूचे राज्य कमिटी सदस्य कॉ.अनिल कराळे,कॉ.दिलीप पोतरे, कॉ. धोंदगीर गीरी आदींनी केले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.शेख नजीर,उत्तम आडे,बिबीसार कवठेकर, शेख सत्तार, इरफान पठाण, दत्ता धनवे,दत्ता शिर्डे,रघुनाथ खुणे, विष्णू मिरासे, विठ्ठल हरण, दीपक कवठेकर,अजिज मिस्त्री, अब्दुल सत्तार,मारुती गाडेकर, याखुब मिस्त्री,शेख विनोद, गंगाबाई धोटे,बाबुराव डांगे, देवजी शेळके, सुमनबाई मढेकर, दत्ता भायमारे,पंजाब कवडे, तुकाराम डोकळे, दशरथ डोंगरे, विठ्ठल गुड्डमवार आदींनीप्रयत्न केले.