
लोहा| छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्व रूढ पुतळा शहराच्या मुख्य चौकात बसविण्याचे निवडणूक काळात जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा वासीयांना आश्वासन दिले होते. त्यासाठी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशीव टीमने १९ फेब्रुवारी पूर्वी छत्रपती शिवरायांचा अश्व पुतळा नियोजित जागी बसविण्याचा निर्णय घेतला असून बुधवारच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव पारित झाला. १६ते १९ फेब्रुवारी दरम्यान पुतळा नियोजित जागी बसविण्यात येणार आहे हा क्षण लोहा वासीयांसाठी ऐतिहासिक ठरणार असून ‘पुतळ्या’ वरून उठसुठ राजकारण करणाऱ्याचा मात्र ” मुखभंग” झाला.

लोह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या वरून गेल्या दीड दशका राजकारण सुरू आहे. नगर पालिकेकडे सत्ताधारी भाजपच्या काळात बळीराजा मार्केटने जागा हस्तांतरण केली. त्या जागेवरच नगर पालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविला जाणार आहे. त्यासाठी रितसर न्यास नोंदणी झाली व आवश्यक त्या परवानगी घेण्यात आल्या. अश्वरूढ पुतळा घेण्यासाठी शिरगावकर यांच्या कलाकृतीला शासकीय मान्यता मिळाली होती. त्यामुळे बुधवारी (१५ फेब्रुवारी) सभागृहात उपनगराध्यक्ष दता वाले यांनी ठराव मांडला आणि सभागृहाने एकमताने ठराव तो पारित केला.

वस्तुतः नगराध्यक्ष हे पुतळा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तर मुख्याधिकारी हे पदसिद्ध सचिव व सर्व नगर सेवक हे सदस्य अशी न्यास नोंदणी झाली.शासकीय जागेवर कोणत्याही खाजगी व्यक्तीस कोणत्याही महामानवाचा पुतळा बसविता येत नाही असा नियम सांगतो. काँग्रेस मध्ये जाण्यापूर्वी नगरसेवक शरद पाटील पवार यांना शिवजयंती व शिवस्मारकासाठी खा चिखलीकर व युवानेते प्रविण पाटील चिखलीकर यांनीच पुढाकार घेण्यास सांगितले आणि ते पुढे झाले. वास्तविक पाहता नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी कधीच पुतळा समितीचे आपणच अध्यक्ष आहोत असे व श्रेयासाठी पुढे आले नाही. पण त्यांनी खा.प्रतापरावांच्या आदेशानुसार पुतळा उभारणीसाठी कार्य केले. दरम्यान गेल्या काही दिवसा पासून पुतळा उभारणीला वेगळे राजकीय वळण देण्यात आले.

वैयक्तिक पातळीवर सोशल मिडीयात गढूळ वातावरण करण्यात आहे. पण प्रविण पाटील चिखलीकर व टीमने भाष्य न करता “आम्हीच करून दाखवणार! हे ठणकावून खरे केले. नगराध्यक्ष, गजानन सूर्यवंशी यांच्या काळात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा राहणार आहे. बुधवारी(१५ फेब्रुवारी) बैठकीत तसा ठराव पारित झाला. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान पुतळा बसविण्यात येणार आहे तसे पत्र कार्यालयीन नगर पालिका अधीक्षक उल्हास राठोड यांनी लोहा पोलिसांना दिले आहे. नगराध्यक्ष यांनी जाहिरपणे कोणतेही वक्तव्य केले नाही पण अखेरच्या चेंडूवर षटकार मारून मॅच जिकली. माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल, करीम शेख, भास्कर पाटील अमोल व्यवहारे यासह सर्व नगरसेवक बैठकीस उपस्थित होते.

