नायगाव। रामतीर्थ तालुका बिलोली येथील आंबेडकरवादी विचाराच्या सुस्वाभावी असलेल्या गिरजाबाई माधवराव गायकवाड यांचे अल्पशा आजाराने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता वयाच्या 75 व्या वर्षी दुखद निधन झाले असून त्यांचा आज 17 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता रामतीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
गिरजाबाई गायकवाड ह्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा रामतीर्थ येथे सेवक म्हणून कित्येक वर्ष कार्य करून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या त्यांच्या पश्चात पती, तीन मुलं दोन मुली, नातू, नाती असा मोठा परिवार असून त्या पत्रकार बळीराम गायकवाड,नवोदय विद्यालयाचे शिक्षक हनमंत गायकवाड आणि मुक्रमाबाद येथील बँकेत कार्यरत असलेले प्रभाकर गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.