
तामसा/हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील मौजे मनाठा जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 16 फेब्रुवारी 11 वाजता दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत ने विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. परंतु तेथे कुठल्याही प्रकारचा ठराव न घेता दारूबंदी अधिकारी यांना बोलावून सदरील गावातील नागरिकांना आधार कार्ड घेऊन बोलावून मतदान घेण्याचे प्रक्रिया पार पाडण्यात आली.

दारूबंदी अधिकारी व कर्मचारी यांना महिलांनी त्यांच्यासमोर दारू बंद करण्यासाठी व्यथा मांडल्या . परंतू सभेमध्ये ठराव न घेता मतदानाची प्रक्रिया करण्यात आल्याचे दिसून आले . या विशेष ग्रामसभेमध्ये शेकडो महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला होता. परंतु त्यांच्या व्यथा, अवस्था, शासनाच्या व अधिकाऱ्याच्या लक्षात येतील का..? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. सदरील शेकडो महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याय व संसाराची होणारी धावपळ आणि सतत नवरा दारू पिऊन त्रास देत असल्याचे असे अनेक प्रकारचे सवाल त्यांनी ग्राम ग्रामसभेमध्ये मांडले.

अशा अनेक समस्याचे मूळ दारू दुकान आहे यासाठी दारूचे दुकान बंद करून सर्व गावातील महिलांना योग्य तो न्याय द्यावा व दारूच्या जाचातून मुक्त करावे असा अनेक महिलांनी दारूबंदी अधिकारी नांदेड निरीक्षक ये एम शेख निरीक्षक यांच्याकडे टाहो फोडला. पुढील प्रक्रिया बाबत आमच्या प्रतिनिधी प्रतिनिधीने विचारले असता गोपनीय अहवाल असल्याचे सांगितले. या गोपनीय अहवालामध्ये खरंच मनाठा येथील दारूबंदी होईल का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये गावकऱ्यांच्या वतीने ही विशेष ग्रामसभा होती की..? निवडणूक प्रक्रिया होती असा असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

