
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे सरसम येथे दि. 11 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास थीम अंतर्गत वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज शिबिराच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने यांनी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे योगासने, प्राणायाम, व्यायाम तसेच लेझीम पथक तयार करून घेतले आणि त्यांना दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.

तदनंतर सकाळच्या सत्रामध्ये वृक्षारोपण रॅली काढण्यात आली, रॅलीत विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, एक व्यक्ती एक झाड म्हणत गावात वृक्षारोपण रॅली काढण्यात आली. रॅली चे विसर्जन करुन विद्यार्थ्यांना चार ग्रुपमध्ये विभागून वृक्षारोपण रॅली काढण्यात आली. या दरम्यान एक व्यक्ती एक वृक्ष, माझं गाव हरित गाव, माझं शहर हरित शहर, माझा तालुका हरित तालुका, माझा जिल्हा हरित जिल्हा, माझ राज्य हरित राज्य, माझा देश हरित देश अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे वृक्षारोपणाकडे ध्यानाकर्षण करून महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला.

तद्नंतर ग्रामपंचायत परिसर व रीस ग्रामपंचायतच्या आसपास जवळपास 85 वृक्षाचे रोपण सरसम ग्रामपंचायतीच्या विशेष सहकार्याने 85 वृक्षाचे रोपण सरपंच सौ. काशीबाई ठाकूर, ग्रामसेवक मा. राजेंद्र भोगे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे आणि सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे, डॉ. शेख शहेनाज, प्रा. हाके, प्रा. निखाते आदींसह करण्यात आले.

दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये आज महिला मेळाव्याच्या अनुषंगाने सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. व तदनंतर नांदेड येथून आलेल्या बालकल्याण समितीच्या सदस्या मा. सौ. सत्यभामा जाधव यांनी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा जनजागृती व पोस्को ऍक्ट’ या विषयावर तब्बल दीड तास वेगवेगळ्या उदाहरणातून पोस्को कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर महिला मेळाव्याच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते ह्या होत्या तर मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामपंचायतच्या सरपंच सौ काशीबाई ठाकूर, डॉ. शेख शहेनाज, सौ. कांबळे मॅडम तसेच जिल्हा परिषद हायस्कूलच्या गुट्टे मॅडम व त्यांच्या अन्य सहकारी मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व सह कार्यक्रमाधिकारी डॉ. एल.बी. डोंगरे यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या मनोगतनंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली झुकरे यांनी केले तर आभार निलेश सटणे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दिलीप माने, हाके सर अपराध्यापक निखाते आदींसह रासेयो चे स्वयंसेवक स्वयंसेविका आणि जिल्हा परिषद शाळा सरसम च्या विद्यार्थिनी आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. तदनंतर प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये लेझीम पत्रकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

