
नांदेड| पंधरा वर्षापूर्वी नांदेडमध्ये मुहूर्तमेढ रोवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संग्राम मोरे तर प्रदेश कार्यकारिणी सदस्य संपादक रूपेश पाडमुख यांची सरचिटणीसपदी निवड प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव अरोटे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.अभयकुमार दांडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मुहूर्तमेढ पंधरा वर्षापूर्वी नांदेडमध्ये रोवण्यात आली. दरवर्षी वृत्तपत्र क्षेत्रातील प्रत्येक घटकांत सेवा देणार्यांना सन्मान करत त्यांना प्रोत्साहीत करत दरवर्षी संघाचे कॅलेंडर, वृत्तपत्र विक्रेता अपघात विमा पॉलीसी काढण्यासह विविध उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असतात. पत्रकार संघाची धुरा सांभाळत असताना सरचिटणीस तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी संघाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करत उपक्रमात खंड पडू दिला नाही. या सततच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश कार्यकारिणीत त्यांची निवड करण्यात आली होती.

पत्रकार संघाची बुधवारी प्रदेश सरचिटणीस विश्वासराव अरोटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अभयकुमार दांडगे व संघाचे ब्रँड अॅम्बासॅडर संजय फुलसांगकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी सिडकोचे अध्यक्ष संग्राम मोरे व सचिवपदी रूपेश पाडमुख यांची जिल्ह्यातील पदकिधारी, सदस्य यांच्या उपस्थितीत खेळी-मेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली.

सदरील निवड सोहळ्याची सुरूवात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापूसाहेब पाटील यांनी केले. प्रदेश सरचिटणीस अरोटे यांनी वृत्तपत्र क्षेत्रात काम करत असताना अगोदर परिवार सांभाळा असे भावनीक आवाहन करताना सामाजीक उपक्रमातून संघटना मजबूत करण्याच्या सूचना केल्या. यावेळी डॉ.दांडगे यांनीही मोलाचे मार्गदर्शन करून नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.

उपस्थित मान्यवरांचे सिडको कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव अरोटे यांचा खोबरे-खारीकाचा हार टाकून व मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. शेवटी आभार सरचिटणीस तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी मानले.

