
नांदेड। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या क्रूर आणि कपटी औरंगजेब ला त्याच्याच राजधानीत जाऊन त्याच्या हातावर तुरी देऊन सीताफिने आग्र्यातून सुटका करून घेतली आणि आपले बुद्धीचातुर्य काय असते हे दाखवून दिले.
महाराजांचे शौर्य आणि पराक्रम स्वराज्याच्या मायभूमीत तर सर्वांनीच पाहिला परंतु दुश्मनाच्या म्हणजेच क्रूर आणि कपटी औरंगजेबाच्या लाल किल्ल्यात जाऊन रनांगण गाजवणारा ऐतिहासिक क्षण म्हणजेच शिवचरित्रतील आगऱ्या ची सुटका.अपमानाचा बदला स्वाभिमानाने घेत हिरे -सोन्यानी भरलेल्या खिल्लतीला धुडकाऊन आपल्या शौर्य आणि पराक्रमाची झलक भऱ्या दरबारात शेकडो सरदार आणि राजे-महाराजे यांच्या समोर औरंगजेबाला ललकारले त्याच “दिवाण ए आम” मध्ये महाराष्ट्र राज्यातून हजारो मावळे जाऊन साजरा करणार भव्य शिवजनमोत्सव सोहळा.

ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय संकट काळी सुद्धा न डगमगता न खचता त्यावर मात कशी करायची आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या स्वाभिमानावर गदा येईल त्या त्या ठिकाणी पेटून उठायचं कारण अपमान सहन करून जगण्यापेक्षा एल्गार पुकारून विरोध पत्करनं हे कधीही चांगलं मग त्याची किंमत किती ही चुकवावी लागली तरी चालेल. महाराजांनी फोडलेल्या डरकाळीची किंमत ही इतकी मोठी होती कि महाराजांच्या जीवावर बेतली होती तरी पण त्यातून अतिशय सीताफिने मार्ग काढत महाराजांनी अग्र्याच्या किल्ल्यातून लाखों दुश्मन सरदाराच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.

ती लढलेली मोहीम म्हणजे जगाच्या पातळीवर एकमेव अशी होती कि आपल्या राजांनी स्वतः सोबत आपल्या एकाही सवंगड्याचा जिव जाऊ दिला नाही सर्व सैन्यासोबत बाळ संभूराजे ना सुरक्षित रित्या रायगडा वर पोहचवणं ही साधारण गोष्ट न्हवती पण ती छत्रपती शिवाजी महाराजांनी लिलया पेलली. याचा आदर्श आज तरुणांनी घेतला पाहिजे शिवचरित्रामध्ये सर्व गोष्टींचे उत्तर आहे ते फक्त आपल्या तरुणांना शोधता आले पाहिजे म्हणुन 393 वी शिवजयंती ही आग्रा येथिल लाल किल्ल्यात करण्याचा मानस आमचा आहे.

सुरवातीला भारतीय पुरातत्व खात्याला आम्ही एक शिवभक्त म्हणुन विनंती केली तेव्हा त्या खात्यानी आम्हास परवानगी नाकारली संबंधित विभागाला चॅलेंज करित अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यात 8 फेब्रुवारीला जस्टिस प्रतिभा सिंह यांच्या समोर दिल्ली उच्च न्यायालयात कोर्ट क्रमांक 43मध्ये सुनावणी. कोर्टाच्या कामकाजामध्ये 46 व्या क्रमांकावर याचिका.ज्येष्ठ एडव्होकेट राजशेखर राव यांच्यासह एडव्होकेट संदीप देशमुख आणि अडव्होकेट निशांत शर्मा यांनी सर्व शिवप्रेमी ची बाजु मांडली तेव्हा दिल्ली उच्च न्यायलयाने असे निर्देश दिले कि, जर का राज्य सरकार यात सह आयोजक म्हणून असेल तर भारतीय पुरातत्व खात्याने शिवजयंती साठी परवानगी द्यायला हरकत नाही.

तेव्हा राज्य सरकार ची यावेळी भूमिका महत्वाची होती सर्व शिवप्रेमी ची भावना लक्षात घेता राज्य सरकारने तात्काळ भारतीय पुरातत्व खात्याला पत्र दिलं आम्ही सह आयोजक व्हायला तयार आहोत आपण परवानगी दयावी तेव्हा भारतीय पुरातत्व खात्याने तात्काळ परवानगी देऊन करोडो शिवभक्ताचा मान ठेवला आणि तसं पत्र काल सायंकाळी (15)प्राप्त झालं.परंतु भारतीय पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली जरी असती तरी लाखों शिवभक्त हे शिवजयंती आगऱ्या च्या लाल किल्ल्यात करणारच अशा ठाम भूमिकेवर होते. आता मात्र रीतसर परवानगी घेऊन आग्रा येथिल लाल किल्ल्यात भव्य दिव्य शिवजयंती सोहळा अजिंक्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून लाखों शिवभक्त साजरा करणार आहेत आणि जवळपास एक करोड शिवभक्त हे जगभरातून डिजिटली जोडल्या जाणार आहेत ह्या अभूतपूर्व सोहळ्यासाठी नांदेड येथुन शेकडो शिवभक्त सामील होणार आहेत अशी माहिती श्याम पाटील वडजे यांनी दिली.

या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक मंत्री तसेच अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

