
नविन नांदेड। वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगून आई बापा शिवाय आपले अस्तित्व नाही, आयुष्यात व दैनंदिन जीवनात आईला तर संकटकाळात बापाला महत्व असल्याचे सांगून अनेक उदाहरणे देत गरूड पुराणासह अंभग यांच्ये उदाहरणे कै.शंकरराव महादजी पाटील शिंदे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त १५ फेब्रुवारी रोजी ढाकणी ता.लोहा येथे आयोजित किर्तन सोहळ्यात भागवताचार्य कुं.आरतीताई शिंदे श्रीरामपूरकर यांनी सांगितले.

ढाकणी ता.लोहा येथे क किर्तनकार शिंदेताई श्रीरामपुरकर यांच्ये किर्तन आयोजित केले होते यावेळी आयुष्य मध्ये प्रत्येकांनी अन्नदान केले पाहिजे तर ज्ञानदान ही आवश्यक असल्याचे सांगून जन्म मृत्यू यासह नारद मुनींची उदाहरणे दिली, संत तुकोबाराय, संत नामदेव, यांच्ये अंभग तर मिरा, कबीर यांच्या भजने व थोर संत यांच्ये उदाहरण दिली तर आजच्या युवा पिढी बदल चिंता व्यक्त केली, तर वडीलांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त केलेला हा किर्तन सोहळा महत्वाचा असल्याचे सांगून शिंदे परिवाराने हा आदर्श उपक्रम घेतल्याचे सांगितले, या किर्तन कार्यक्रमास पळशी व आंळदी येथील भजनी मंडळ व मृदग साथ कृष्णा महाराज यांनी दिली.

यावेळी किर्तन सोहळ्याला युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, कंधार काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे,संरपच प्रतिनिधी भिमराव लामदाडे, शाम पाटील कांजाळकर, भाजपा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, माजी सभापती प्रतिनिधी शंकरराव पाटील ढगे, संरपच प्रतिनिधी साईनाथ टरके, माजी पंचायत समिती सदस्य नरेंद्र गायकवाड,गुतेदार लोहीया, नगरसेवक राजू पाटील काळे, रमेश शिंदे,यांच्या सह अनेक गावांतील संरपच ऊपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य,जेष्ठ नागरिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,या कार्यक्रमाचे आयोजन माधवराव व्यंकटराव पाटील शिंदे, पंचायत समिती लोहाचे सभापती आनंदराव शंकरराव पाटील व शिंदे परिवार यांनी केले होते,या किर्तनास ग्रामीण व शहरी भागातील भाविक भक्तांची व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,महाप्रसादाने या किर्तन सोहळ्याची सांगता झाली.

