नवीन नांदेड। महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
नांदेड तालुक्यातील प्राचिन हेमांडपंथी व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली असून महाशिवरात्री निमित्त हभप राजेजी महाराज हनुमान मंदिर पुजारी विष्णुपुरी यांच्या कृपा आशिर्वादाने तसेच हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे,१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० काल्याचे किर्तन हभप माऊली महाराज शिंदगीकर यांचे व व त्यानंतर महाप्रसादास सुरूवात होईल.
महाशिवरात्री निमित्ताने करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाई मुळे मंदिर परिसर हा उजळून गेला असुन १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते श्री काळेशवर भगवान महाअभिषेक व रात्री १२ ते ५ ईतर भक्तांचे अभिषेक होईल व १९ फेब्रुवारी रोजी सकाळी भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी राहील.
ग्रामीण पोलीस स्टेशन चा वतीने भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णा कोकाटे, उपविभागीय अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार,महिला पोलिस, होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.