
उस्माननगर। पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे देवस्थान म्हणून परिचित असलेल्या हजरत सय्यद फजले मौला ( रहे) उस्माननगर ता.कंधार येथे दि.२३ फेब्रुवारी रोजी गुसल शरीफ व संदल शरीफ आणि दि.२४ रोजी कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उस्माननगर येथील प्रसिद्ध असलेले देवस्थान हजरत सय्यद फजले मौला ( रहे .) हे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले देवस्थान आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि..२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्री आनंदराव रावसाहेब घोरबांड यांच्या घरापासून ते गावातील प्रमुख रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.तर दि.२४ फेब्रुवारी रोजी रात्रीला इरम चिश्ती औरंगाबाद ,व समीर लाज सोलापूर यांचा शानदार कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी ,भक्तांनी कव्वालीचा व उर्साच्या सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उर्स कमिटी दर्गा शरीफ आणि उस्माननगरवासी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

