हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे सरसम येथे दि. 11 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास थीम अंतर्गत वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज शिबिराच्या सहाव्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने यांनी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे योगासने, प्राणायाम, व्यायाम तसेच लेझीम पथकाचे प्रात्यक्षिके करून घेतली. आणि त्यांना दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
सकाळच्या सत्रामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराच्या अगोदर रक्तदान शिबिराच्या संबंधाने जनमानसात असलेली समज गैरसमज या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना बालाप्रसाद भालेराव यांनी सखोल असे मार्गदर्शन करून रक्तदान करणे स्वतःच्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे. याची सखोल अशी माहिती दिली. तदनंतर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील रक्तपेढीचे डॉ. पवार सर व डॉ. संस्कृती मॅडम आणि त्यांच्या पथकासह येऊन रक्तदान शिबिराचे नियोजन केले.
या शिबिरामध्ये जवळपास 21 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. त्यात राष्ट्रीय सेवा योजना कार्यकार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे तसेच सहकार्यक्रम अधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे, यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. के. बी. पाटील, डॉ. सय्यद जलिल, प्रा. राजू बोंबले तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री सचिन कदम आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आतिश गरदसवार, नारायण मुद्दनवार, नूतन कांबळे, ऋत्विक ठाकरे, शैलेश ताडेवाड, वैभव ताडकुले, वैभव पंडागळे, योगेश हाके, सतीश जेजरवाड, कपिल नारखेडे, शिवप्रसाद ताडकुले, राघवेंद्र कोमावार, अनिकेत कवडे, तसेच सरसम येथील तरुण गोखले व पांड्या आदी रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराची शोभा वाढवली.
दुपारच्या बौद्धिक सत्रात पर्यावरण जनजागृती काळाची गरज या विषयावर अर्जापूर येथून आलेल्या हुतात्मा पानसरे महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश शिंदे यांनी अभ्यासपूर्ण सविस्तर असे मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना तब्बल एक तास विषयाशी निगडीत अनेक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून खेळवून ठेवले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश चटणे यांनी केले तर आभार वैशाली झुकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला संपूर्ण स्वंयसेवक व स्वयंसेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.