
उस्माननगर। बालकलावंतांच्या भावविश्वानेच आम्हाला खुप काही शिकवले यांच्या कलाकृतीचे परीक्षण ही परीक्षकांची परीक्षा होतं. असे गौरव समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक ,कलाध्यापक तथा परिक्षक राजीव आंबेकर यांनी केले.

आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने पं. पु. गुरूदेव श्री श्री रविशंकर यांच्या अगमना निमीत्य घेन्यात आलेल्या ” रंगोत्सव “या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ दि. १२ फेब्रुवारी रोजी भक्ती लॉंस येथे संपन्न झाला.या स्पर्धेत एकुण ७२ शाळांनी सहभाग नोंदवला असून ३६४३ स्पर्धकांनी आपली चित्रकृती सादर केली. विविध गटातुन एकुण ४० पारितोषिके देन्यात आली.

कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानीं आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक व रंगोत्सव चे आयोजक संदिप निखाते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर सौ. जयश्री पावडे, प्रा. चंद्रकात पोद्दार, कलाध्यापक राजीव अंबेकर हे उपस्थित होते. राजीव अंबेकर यांनी परीक्षक म्हणून आपले मनोगत व्यक्त करतानां या बालकलावंतांच्या भावविश्वा ने च आम्हाला खुप काही शिकवले यांच्या कलाकृती चे परीक्षण हि आम्हा परीक्षकांची परीक्षा होती आशे गौरव उद्गार काढले. चित्र परीक्षणा तील गमतीपण राजीव अंबेकर यांनी सांगीतल्या यावेळी प्रा. चंद्रकात पोद्दार व मान्यवरांनी आपले मणोगत व्यक्त केले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. चंद्रकात पोद्दार, प्रा. नासेर सर, कलाध्यापक राजीव अंबेकर, विजयसिंह ठाकुर, अनिल कुमठेकर, विक्रांत हाटकर, प्रदीप सुर्यवंशी इ. प्रतिथयश कलाध्यापक लाभले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सर्व स्वयंसेवक वनिष्क कुर्हे, सविता हालाळे,पुजा गंगाखेडकर, संध्या संगेवार, डॉ. अर्चना कासराळीकर,अनुराधा पांडे, दिपाली बिरादार, राजश्री जोशी, प्रशांत गुजळा, विनय पावडे, नरेंद्र रत्नपारखी, पारस पोखर्णा, दयानंद माने,मंगेश खानापुरे आदींनी परीश्रम घेतले.

