
हिमायतनगर। महाशिवरात्री तथा 87 व्या त्रिमूर्ती शिवजयंतीच्या पावन पर्वावर ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे हिमायतनगर शहरातील भाविक भक्तांना महाशिवरात्री दिनी बारा ज्योतिर्लिंगाची दिव्य दर्शन व्हावं या उद्देशाने दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी या तीन दिवशीय कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 08 वाजेपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन घेता येणार आहे. या सुवर्ण संधीचा शहरातील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हिमायतनगर शहरात प्रथमच महाशिवरात्रीच्या पवन पर्वावर श्री परमेश्वर मंदिर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे बारा ज्योतिर्लिंगाचे प्रतिरूप एकच ठिकाणी स्थापित करून भगवान महादेवाच्या कल्याणकारी कर्तव्याचा संदेश देण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान प्रदर्शन, व्यसनमुक्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिमायतनगर शहरासह दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी बारा ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परमेश्वर मंदिर कमिटीचे संचालक शांतीलाल श्रीश्रीमाळ, ब्रह्मकुमारी शितलदीदी यांनी केले आहे. तीन दिवसीय चालणाऱ्या 12 जोतिर्लिंग दिव्य दर्शनाची वेळ सकाळी १० ते सांयकाळी ८ वाजे पर्यंत असणार आहे. त्यात दररोज सकाळी गावातील प्रमुख १२ जोडप्यांच्या हस्ते प्रत्येकी एका एका ज्योतिर्लिंगाचा जल अभिषेक केला जाणार असल्याचे ब्रह्मकुमारी शितलदीदी यांनी सांगितले.

