
हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। क्रांतीकराचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रूई येथे अभिवादन करण्यात आले.

परकीयांच्या जुलमी राजवटीत अन्यविरोधात पेटून उठणारे थोर क्रांतिकारक क्रांतीकारकांच्या अनेक पिढ्या घडवणारे वस्ताद आपल्या युद्ध कौशल्याने बुद्धीचातुर्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिगुरू वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हदगाव तालुक्यातील रुई येथे वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लहुजी नगर येथे क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर पत्रकार गोलु पवार यांनी क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या जीवन चरित्रावर सखोल मार्गदर्शन करून लहुजी साळवे यांच्या विचारावर आजच्या तरुण पिढीने चालण्याची गरज आहे असे प्रतिपादन पत्रकार गोलू पवार यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य लता अर्जुन काळे पंडित पवार श्रीनिवास पवार संभाजी पवार रामदास पवार गणेश पवार तान्हाजी पवार बालाजी पवार आनंदा हापसे प्रकाश पवार देवानंद काळे सुदर्शन पवार बालाजी श्रीनिवास पवार विकास पवार भाऊ पवार तुषार पवार भैय्यासाहेब पवार व महिला व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

