
हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिरात बुलढाणा अर्बन बैंकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षाचीपरंपरा जोपासत आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून दर्शनासाठी दाखल झालेल्या भाविकांना साबुदाणा फराळाचे वितरण करण्यात आले. याचे उदघाटन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष आदणीय भाईजी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर माननीय डॉ. सूकेशजी झंवर साहेब तसेच नांदेड 2 चे विभागीय व्यवस्थापक माननीय रोशनजी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक श्री संजीव बच्छाव, श्री विवेक पांडे अमोल वानखेडे, धनंजय सूर्यवंशी, दिगंबर कूरे, संदीप चव्हाण, चंद्रशेखर जेजेरवाड, नजीब खान व सचिन पालदेवार प्रसाद वाटपासाठी पुढाकार घेतला. यावेळी यावेळी मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, सदस्य राजेश्वर चिंतावार, लक्ष्मणराव शक्करगे, देवीदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, शाम पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, राजाराम झरेवाड, श्रीमती मथुराबाई भोयर, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती लताबाई पाध्ये, माधव पाळजकर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुरावजी भोयर, यांच्यासह दर्शनासाठी दाखल झालेले भाविक भक्त व गावकरी मंडळी उपस्थित होती.

