
वडगाव पोटा। संसाररूपी भवसागरातून जीवाला तरुण जायचे असेल तर ईश्वराच्या नाम स्मरणाशिवाय तरुण उपाय नाही त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवा म्हणजे तो आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही असे वेद पुराण देतात ग्वाही निश्चितच जीवाला सुख शांती समाधान पाहिजेत असेल तर देवाला आपलेसे करून घ्या त्यानेच जीवाला सुख मिळेल यात निश्चितही शंका नाही.चिंता करू नका देवाच्या नामाचे चिंतन करा असा विश्वास पोटा बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताह तील कीर्तन मालिकेमध्ये हिमायतनगर तालुका वारकरी सांप्रदाय भूषण हरिभक्त पारायण माधव महाराज बोरगडकर यांनी व्यक्त केला.
ईश्वराने तुम्हा आम्हाला दिलेला हा नरदे हे अतिशय मौलिक आहे.

आपण माणूस म्हणून जन्माला आलो माणसासारखं वागले पाहिजे पशुपक्षी खव्याने एकत्रित असतात मग माणूस का राहू नये माणसाने निसर्गसृष्टी मधल्या काही नियमाचे पालन करावे या संसाररूपी सागरातून तरुण जाण्यासाठी ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय आपल्याला तरुण उपाय नाही मोक्षाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती जीवाला करून घ्यायची असेल तर चिंता करू नका देवाच्या नामाची चिंतन करा त्या चिंतनाने आपल्या आयुष्यातील दुःख नाहीसे होऊन सुखाची हिरवळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही वेद वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप फक्त ईश्वराच्या नामाशिवाय जीवाचा उद्धार होत नाही मिळालेला नरदेह हा कळावा लागतो आणि ज्यांना हा कळाला त्यांचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही ईश्वराची दिव्यशक्ती सर्वत्र भरून उरलेली आहे परंतु या शक्तीचा प्रत्यय येण्याकरिता आपली ही योग्यता त्या स्थळावर उभी राहिली पाहिजे .

महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या अनेक संत महात्म्यांनी त्यांचा अनुभव तुम्हा आम्हाला सांगितलं ईश्वर प्राप्तीसाठी त्याच्या चिंतनाशिवाय कुठलाच मोक्षाचा मार्ग जीवाला सापडत नाही हा सिद्धांत आहे. सुखासाठी धडपड करणाऱ्या प्रत्येक जीवाला संसार रुपी भवसागरातून तरून जायचे असेल तर संताच्या सानिध्यात राहून देवाला आपलंसं करून घेणे हा त्यामधला एकमेव मार्ग आहे ज्यांना हा मार्ग सापडला ते धन्य झाले आपणही त्यांच्या बोलावर विश्वास ठेवून जीवनात वागलो तर आपलही निश्चितच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास हिमायतनगर तालुका वारकरी संप्रदायाचे भूषण ह भ प माधव महाराज बोरगडी कर यांनी पोटा बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताह किर्तन मालिकेतून उपस्थित सर्व भाविक भक्तांना उपदेश करताना केला.

