
वडगाव/ पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील वडगाव खुर्द येथील महाशिवरात्र निमित्ताने भैरवनाथ मंदिरामध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे गावकऱ्यांच्या वतीने आयोजन असून या कार्यक्रमासाठी मराठवाडा विदर्भ तेलंगाना या तिन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी जमणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडगाव खुर्द येथील भैरवनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्र निमित्ताने भैरवनाथ देवांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर उपस्थित राहणार आहे महाशिवरात्री ते शिमगा या पंधरा दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व जाती धर्माच्या लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने थाटामाटा व श्रद्धेने कार्यक्रम केला जातो. गावामध्ये पंधरा दिवस रात्रीला जागा असतो चाफनात येतील जोगी महाराज व त्यांचे सहकारी येऊन पंधरा दिवस जागरणाचा कार्यक्रम सातत्याने गावात होतो जाज्वल असलेले हे भैरवनाथ देवस्थान सर्व जाती धर्माचे लोक यांची पूजा करतात तर काही मंडळी काळभैरव म्हणून यांचे वर्णन करतात देवाची पूजाअर्चाही फुल आणि तेलाने केल्या जाते.

महाशिवरात्रीच्या अगोदरच गावातील सर्व कुटुंबातील व्यक्ती आपली घरदार, परिसर, कुटुंबातील सर्व कपडे स्वच्छ करून घेतात व महाशिवरात्रीच्या दिवशी जागराच्या आरतीला हजारो भाविक उपस्थित असतात ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून गावामध्ये चालू आहे आजही मंदिर परिसरामध्ये मांसाहारी मद्यपि मासिक पाळी येणारी महिला भगिनी ही फिरकत नाही नकळत असे झाल्यास अक्षरशा काळभैरवाच्या मूर्तीवर दुर्गंधी येऊन त्यात अळ्या निर्माण होतात हे वास्तव्य स्थिती आजही पाहायला मिळते तेव्हा गावातील माळकऱ्यांच्या हस्ते त्याची पूजाअर्चा अभिषेक करून दही दूध तूप गौतर आधी पंच अमृताने देवांना स्नान घालून स्वच्छ केलेल्या जाते ही परंपरा आजही पहावयास मिळते.

काळभैरवा साठी काशीखंड पुराणामध्ये आख्यानिका असून काळा सुर नावाच्या दैत्याचा काशी क्षेत्रावर मोठा उच्चांक होतो अनेक गो ब्राह्मणांचा छेळ करून देवावरी हल्ला करतो केव्हा महादेवाच्या डाव्या भुजांचे स्फुरण होऊन त्यामधून काळभैरवाची निर्मिती होती व हाती खर्ग घेऊन काळभैरव काळा नावाच्या दैत्याचा नायनाट करून प्रजेला व देवांना सुखी करतो तेव्हा शंकर प्रसन्न होऊ काळभैरवांना आपल्या ईश्वर काशीची रक्षण करण्यासाठी स्थापना करतात हाच तो काळभैरव वडगाव येथे असून व दुसरे मंदिर हिंगोली जिल्ह्यातील चाफनाथ या गावी आहे.

देवा बद्दलची व्याख्या किका आजही गावातील अनेक वृद्ध पुरुष महिला तरुणांना सांगत असतात जाज्वल्य देवस्थान असलेले भैरवनाथ मंदिर येथे वर्षातून वीस ते पंचवीस वेळा गावासह परिसरातील अनेक नागरिकांना नगरभोजनाचे महाप्रसाद होतात अनेकांच्या नवसाला पावणारा हा देव असल्याचे भाविकांच्या तोंडून ऐकावयास मिळते उद्या महाशिवरात्री निमित्ताने भैरवनाथ मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भक्ताची मांडी आणि जमते धार्मिक सामाजिक उस्तव पंधरा दिवस सतत गावात असतो दररोज भैरवनाथाची सकाळ दुपार सायंकाळ पारंपारिक वाद्यांमध्ये आरती केल्या जाते आरतीसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असतो. वडगाव गाव हे म्हणजे जणू काही पंधरा दिवस काशिच असल्याचे वयोवृद्ध नागरिकाच्या तोंडून ऐकवा असे मिळते.

