
नांदेड। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थायलेसेमिया ग्रस्त बालकांसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिवगर्जना वैद्यकीय प्रतिनिधी मित्र मंडळ व श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप ,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला असून, 21 थायलेसेमिया ग्रस्त बालकांना दत्तक घेण्याचे ठरविले आहे.

त्यानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजीत रावत साहेब व माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीधर कोकाटे साहेब यांना तसेच माननीय श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

आमचा हा 21थायलेसेमिया ग्रस्त बालकांना दत्तक घेण्याचा उपक्रम ऐकून माननीय कलेक्टर साहेब व माननीय श्री साहेब तसेच सी.ओ. मॅडम यांना खूप आनंद झाला व त्यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा करून कार्यक्रमास येण्याचे मान्य केले व काही तुम्हाला मदत लागल्यास सांगावे म्हणून आम्हास आश्वासन दिले. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

