
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर ता.कंधार येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती, हिंदी, मराठी गीतावरील वार्षीक सांस्कृतिक कार्यक्रमात नाटिका देशभक्ती लोकगीतांच्या कलाविष्कार सादरीकरणामुळे श्रोते ,पालक आनंदीत मंत्रमुग्ध झाले.

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय उस्मानननगर तालुका कंधार या शाळेचे सचिव श्री बालाजी पाटील पांडागळे व शिराढो नगरीचे सरपंच तथा भीमाशंकर विद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शिवसांब कोरे व शिक्षक ,शिक्षिका व इतर कर्मचाऱ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आऔचित्य साधून शाळेमध्ये मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून तालीमी मध्ये घडविले दि.१६ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ शिराढोण चे संचालक सौ.जोतीताई बालाजी पांडागळे हे होते तर कंधार पंचायत समितीच्या माजी सभापती लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील, घोरबांड, पोलीस उपनिरीक्षक सुनिल पल्लेवाड, उद्घाटक म्हणून खुशालराव पांडागळे भीमाशंकर मा.व उच्च मा.विद्यालयाचे प्राचार्य तथा सरपंच शिराढोण हे होते.

सौ अनुराधा खूशाल पांडागळे,प्राध्यापक विजय भिसे, कमलाकर शिंदे, बालाजी काळम ,दहिकळंबा येथील सरपंच अवधूत शिंदे, नीलमताई गौंड ,गोविंदराव वारकड तेलंगवाडी (माजी सरपंच ),गंगाधर भिसे,गोविंद पोटजळे,शिवशंकर काळे ,उपसरपंच बाशीद शेख, बुद्धाची घोरबांड ,संदिप घोरबांड यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते .यांच्या उपस्थितीत सरस्वतीचे पूजन करून लोकनेते कैलासवाशी माधवराव पंडागळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने केली व नंतर देशभक्ती गीतावर नृत्य करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या गीतावर प्रेक्षक, पालक आनंदित होऊन टाळ्या वाजवून दाद दिली यानंतर देशभक्ती, हिंदी, मराठी गिते ,लावणी व अफजलखानाचा वध ,शिवाजी महाराजांचा पाळणा ,भीमगीत व समाज प्रबोधन नाटीका सादर केली ती नाटिका वंशाच्या दिव्यापायी नको विझवू पणती ग आई ही स्त्रीभ्रूणहत्या कशी करतात या नाटकेमधून दाखविण्यात आले .त्यानंतर दुसरी नाटीकेचे सादरीकरण केले ती नाटिका ज्यांच्यासाठी केले श्रम त्यांनी दाखविले वृद्धाश्रम ही ह्रदयस्पर्शी नाटिका सादर केली या नाटिकेचे व गीतांचे ,नृत्यांचे सादरीकरणाने उपस्थितांचे मने जिकली त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे ( कोरोना काळ वगळून ) दरवर्षी आयोजन करण्यात येते, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेचे सचिव बालाजी पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्याध्यापक शिवसांब कोरे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत .सदर कार्यक्रमात मूल व मुलींनी आपल्या कलागुणातून एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्यगीतांची सादरीकरण केले. हे नृत्य पाहून सर्वजण भाराहून जाऊन जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक केले उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांची प्रशंसात केली व शुभेच्छा दिल्या .

या सादरीकरणाने प्रेक्षक ,पालक विद्यार्थी आनंदीत झाले हा सांस्कृत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिवसांब कोरे, विठ्ठल चिवडे, दौलत पांडागळे ,भगवान जाधव ,मनीषा अन्नमवाड,सविता शेटकर, वर्षा कळम ,सुनील जमदाडे ,रहेमान पठाण व शिक्षकेतर कर्मचारी हनुमंत घोरबांड ,काशिम शहा,बालाजी वारकड , सुक्रे ,आदींनी परिश्रम घेतले . हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील श्रोते, विद्यार्थी ,पालक पत्रकार , राजकीय, शैक्षणिक ,आदि उपस्थित राहून कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला या कार्यक्रमाची प्रस्ताविक व आभार मुख्याध्यापक शिवसांब कोरे यांनी केले तर सूत्रसंचालन भगवान जाधव व विठ्ठल चिवडे यांनी केले व शेवटची राष्ट्रगीताने सांस्कृत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

