
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.संतानी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले.त्यांचे ग्रंथ, अभंग,भजन हे निष्काम भक्तीचा भांडार आहे.संत हे परिवर्तनाचे व्यासपीठ आहेत.आपल्या जिवनात संताचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे विचार समाजप्रबोधन कीर्तनकार शि.भ.प.विकास भुरे यांनी मांडले.

गडगा येथील सिध्देश्वर मंदिरात आयोजित अखंड शिवनाम सप्ताहात शि.भ.प.विकास भुरे यांची कीर्तनसेवा लाभली होती. अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संतांचे संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या अभंगावर दोन तासांच्या कीर्तनातून त्यांनी संतांची ज्ञानदृष्ठी, शकून,अलौकीक शकून, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आधी लगीन कोंढ्यान्याचे नंतर माझ्या रायबाचे असे म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी खिंड लढविणारे राजनिष्ठ सुभेदार तानाजी मालुसरे शकुन अपशकून यांचा विचार न करता केवळ आपली निष्ठा स्वराज्या साठी समर्पित केली.

आदी विविध मुद्यांवर लोकप्रबोधनात्मक विचार मांडले. यावेळी मृदंग वादक म्हणून नागनाथ वारे, हार्मोनियम माधव पांचाळ,गायन माधव कळसे, बालकलाकार ताकबिडे, बापूराव खुजडे, शिवराज मुंडकर बापुराव खुजडे, वसंत जाधव, शिवा माळगे यांची साथसंगत होती.

