
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। तालुक्यातील पाटोदा येथे शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत हा शिवजन्मोत्सव सोहळा रंगणार असून खासदार प्रताप पाटील चिखलीकर व संदीप पाल महाराज अमरावतीकर आणि तसेच एपीआय महादेव पुरी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजता कुंटूर पोलीस ठाण्याचे ए पी आय महादेव पुरी व सरपंच प्रतिनिधी हरीषचंद्र पा शिंदे यांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण होणार आहे तसेच 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजिरी वादक संदीपपाल महाराज अमरावतीकर यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम व इतर व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित राहणार आहेत.

तसेच उद्घाटक म्हणून शिवराज पाटील होटाळकर (माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड) , रवींद्र पाटील चव्हाण (नायगाव विधानसभा युवा नेते काँग्रेस) , श्रावण पाटील भिलवंडे (माजी पंचायत समिती सभापती) , वसंत पाटील सुगावे(प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस) , दिलीपराव धर्माधिकारी (भाजपा नेते) , बालाजी मदेवाड (काँग्रेस नेते) यांची उपस्थिती राहणार आहे तरी सर्व शिवप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पाटोदा शिवजन्मोत्सव समिती चे अध्यक्ष गुरुनाथ शिवाजी पाटील शिंदे व शिवजन्मोत्सव समिती चे पदाधिकारी यांनी केले आहे.

