हिमायतनगर। श्री परमेश्वर मंदिर मैदान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेला पोलीस निरीक्षक बी डी भुसूनर, महावीरचंद श्रीश्रीमाळ, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, संजय माने व ईतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.
हिमायतनगर (वाढोणा) परमेश्वर मंदिर प्रांगणात अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक शिवजयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक बी डी भुसनर, परमेश्वर मंदिर उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, नायब तहसिलदार तामसकर, भाजप तालुका अध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष अ अखिल अ हमीद, विलासराव वानखेडे, खंडू चव्हाण, डॉ शेषराव चव्हाण, डॉ गणेश कदम, पत्रकार अनिल मादसवार, प्रकाश जैन, सोपान बोंपिलवार, मनोज पाटील, कानबा पोपुलवार, अनिल भोरे, अनिल नाईल, शिवाजी जाधव, गजानन मुत्तलवाड, संजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिमा पूजनानंतर पांडुरंग तुप्तेवार, गजानन हरडपकर, गोविंद शिंदे, संदीप कदम, सुनील चव्हाण, बालाजी ढोणे, अनिल माने, हिदायत खान, चेरमन प्रवीण शिंदे, सतीश सूर्यवंशी, संतोष वानखेडे, साई कोमावार, विकास नरवाडे, ज्ञानेश्वर शिंदे, सुभाष शिंदे, शाम ढगे, बबलू काळे, योगेश चिल्कावार, प्रकाश रामदीनवार, डी बी पाटील पारवेकर, सरपंच जीवन जैस्वाल, किरण माने, प्रदीप नरारे बालाजी बल्पेलवाड मुन्ना शिंदे संतोष डांगे अरविंद वानखेडे राम शिंदे, संजय पेन्शनवार, विठ्ठल शिंदे, संतोष साभळकर, पंडित ढोणे, बालाजी लिंगमपल्ले, अनिल अल्कटवार व अनेक शिवभक्त उपस्थित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला.