
नांदेड। शहरापासून जवळच असलेल्या सोमेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह शिवलीलामृत पारायण व भागवत कथा ज्ञानयज्ञ तसेच लक्ष्मण श्रावण शक्ती सोहळा आयोजन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला महंत 1008 जीवनदास महाराज चुडावा महंत 1008 राम भारती महाराज मोहनपुरा व ह भ प भाऊसाहेब महाराज पावडेवाडी कर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला श्रीमद भागवत कथा प्रवक्ते ह भ प सुरेश महाराज पांढरगावकर यांच्या मंजुळ सुराणे हा कार्यक्रम सात दिवस पार पडला या कार्यक्रमाला भाविकांची नांदेड जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून भाविकांची अलोट गर्दी जमली होती या कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सात दिवस भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते महाशिवरात्री निमित्त पहाटे अभिषेक करण्यात आला महाशिवरात्री निमित्त दिवसभर चाललेल्या सप्ताह निमित्त समर्थ हॉस्पिटल कावलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले आमदार कल्याणकर उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले की या मंदिरासाठी एक कोटी रुपयाचा निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सिमेंट काँक्र रेट फेवर ब्लॅक व गार्डन व नव्या गावाजवळील मुख्य कमान भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा इत्यादी कामे तात्काळ करण्यात येतील या मंदिरात दर सोमवारी मोठ्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते या कार्यक्रमानिमित्त मोफत निदान शिबिर उपचार घेण्यात आला या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख संतोष भारसावडे उप तालुकाप्रमुख गणेश बोकारे माधव हिंगमिरे नवनाथ काकडे बाळू सातोरे माधव वाघ बाबुराव बोकारे पत्रकार आनंदा बोकारे रामराव बोकारे विक्रम बोकारे ज्ञानेश्वर बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात डॉक्टर अमोल देवसरकर डॉक्टर अमोल चावरे डॉक्टर गोविंद चव्हाण डॉक्टर दिपाली चव्हाण डॉक्टर पवन जाधव डॉक्टर उनकेश्वर पवार निवघेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना मोफत शिबिर घेऊन औषधोपचार व तपासणी करण्यात आली या उपचाराचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेतला व रात्री लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला 19 रोजी शिवजयंती ही सप्ताहात साजरी करण्यात आली.

दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा ह भ प यादव महाराज वाईकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे कीर्तनानंतर मोठ्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आयोजित आयोजन गावकर या मार्फत करण्यात आली आहे. तरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने या महाप्रसादाचा लाभ घ्यावाअसं आवाहन करण्यात आले आहे.

