
नांदेड| तिरंगानगर तरोडा खु.येथे विकास समन्वय समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आज सकाळी संपन्न झाला.प्रारंभी समितीचे उपाध्यक्ष हरी फुलवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच समिती सचिव रामचंद्र देठे, समितीचे ज्येष्ठ सदस्य भगवान गोणारकर यांनीही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तिरंगानगर विकास समन्वय समितीच्या कार्यालयात (विठ्ठल निवास)हा अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

