
हिमायतनगतर। तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेली सिरंजणी ग्रामपंचायत तालुक्यातील सक्रीय ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला येत आहे. सौ मेघा पवन करेवाड ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्यापासून गावात विविध विकास कामांना गती मिळाली आहे. विकास कामांसोबतच गावात विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातं आहेत.

ग्रामपंचायत कडून गावातील विविध भागात सांडपानी व्यवस्थापन करण्यासाठी भूमिगत गटारांचे मोठ्या प्रमाणात बांधकाम करून सार्वजनिक स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाकडून स्मार्ट गाव योजनेत स्पर्धक म्हणून सिरंजणी ग्रामपंचायत ची निवड करण्यात आली होती .

त्याच बरोबर धार्मिक सन उत्सवात सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी सरपंच कुटुंबाकडून सर्व जाती पातीच्या नागरिकांना भेट वस्तू देऊन त्याचा गौरव करून त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घेण्याचा स्तुत्य प्रयत्न केल्या जात आहे. ह्या सर्व बाबींची दखल घेऊन शिवसृष्टी प्रतिष्ठान जालना व माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधून शिवछत्रपती आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सदरील पुरस्कार हा केवळ सरपंचाचा नसून गावातील नागरिकांनी वेळोवेळी केलेले सहकार्य, वरिष्ठ नागरिक व सुशिक्षित कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन तसेच ग्रामचैतन्य अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन श्रमदानातून ग्राम स्वच्छता करणाऱ्या गावकऱ्यांचा हा सन्मान आहे असे मत मेघा करेवाड यांनी व्यक्त केले.

