
अर्धापूर| भोकर विधानसभा मतदारसंघांत पाणीपुरवठ्याच्या १२४ योजना मंजूर करुन घेतल्या असून,कोट्यावधींचा निधी मंजूर केला,गुतेदारांनी उच्च प्रतीचे काम करावे, दुसऱ्यांदा हा निधी मिळत नाही,अधीकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचे ऐकून चुकीचे काम करु नये,अधीकारी फिफ्टी फिफ्टी सारखे वागत आहेत,चुकीच्या पध्दतीने काम करणाऱ्या अधीकाऱ्यांना माफी नाही असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

बामणी येथे कोल्हापूरी बंधारा व पाणी पुरवठा जलकुंभ व नळ योजना कामाचे भूमिपूजन शनिवारी आ.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी माजी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,चेअरमन गणपतराव तिडके, उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण,संजय लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,शामराव टेकाळे, छत्रपती कानोडे, राजेश्वर शेटे,मुसव्वीर खतीब, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गावकऱ्यांनी पाहुण्यांचा सत्कार केला,ना.अशोकराव चव्हाण म्हणाले कि,अर्धापूर, मुदखेड तालुक्यात नव्याने ११ बंधारे मंजूर करण्यात आले आहेत,मतदार संघातील सर्व गावांसाठी शुध्द पाणी पुरवठा योजना आणली आहे,या योजनेचे गुतेदारांनी काम ऊकृष्ठ करावे, याकामी अधिकारी व गावकऱ्यांनी लक्ष द्यावे,देश हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे,लोकसभा निवडणुकीसह येणाऱ्या निवडणुकीत काॅग्रेसला साथ द्या असे ते म्हणाले.राजूरकर म्हणाले कि,अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात विक्रमी निधी आणल्याने सर्वत्र कामेच कामे दिसत आहेत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू कदम प्रस्तावित बालाजी कदम आभार मारोती स्वामी यांनी मानले. यावेळी अॅड सुभाष कल्याणकर, बळवंत इंगोले,संजय लोणे, प्रवीण देशमुख,व्यंकटराव साखरे, साहेबराव राठोड,सरपंच शिल्पा साहेबराव कदम, उपसरपंच मणकर्णाबाई,मालू चिंतले, सचिव निळकंठराव मदने, किशनराव कदम,यशवंतराव राजेगोरे,अभियंता चोपडे,रामगीरवार,शंकरराव टेकाळे, अशोक देलमडे,बाळू पाटील, डॉ आनंद शिंदे,मोतीराम जगताप, व्यंकटी राऊत, सोनाजी सरोदे,राजू बारसे,राजू पाटील,दता पाटील यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

