
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर हर हर महादेवच्या जयघोषात वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वराचे लाखो भावीकांनी दर्शन घेतले. तसेच कीर्तनानंतर मध्यरात्रीला वेदशास्त्रींय मंत्रोच्चारात श्री परमेश्वराचा महाअभिषेक तहसीलदार डी.एन. गायकवाड यांच्या हस्ते होऊन श्रीचा अलंकार सोहळा विश्वस्त मंडळींच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी मानकर्यांनी श्री परमेश्वरास भगवा ध्वज चढवीत पुरण पोळीचे नैवैद्य दाखवून पारण्याचा उपवास सोडला.

लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वराचे महाशिवरात्री दिनी माजी आ.माधवराव पाटील व बाबुराव कदम कोहळीकर यांनी दर्शन घेतले. भक्तांच्या अलोट गर्दीमुळे सायंकाळी १० वाजेपर्यंत श्री दर्शनाला रांगा लागल्या होत्या. रात्री 8.30 वाजता हभप. सुरेश महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव – पावर्तीचा महाअभीषेक सोहळा मध्यरात्री ११ ते १२ च्या दरम्याण संपन्न झाला. त्यानंतर मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्ष डी.एन.गायकवाड यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक व महापुजा संपन्न झाली. पूर्वीपासून चालत आलेल्या वतनदारांच्या पुजेनंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, बाजूबंद, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, नेकलेस आदींसह अन्य आभुषने मंदिराचे विश्वस्त संचालक मंडळींंच्या उपस्थीतीत चढवीण्यात आली. श्रीच्या मुर्तीवरील अलंकार दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त ठेवन्यात येतात. या अलंकार विभुशीत श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात.

शिवरात्रीच्या दुस-या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड – बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन भगवे झंडे लावले जाऊन पुजा- अचर्ना करण्यात आली. तसेच श्री परमेश्वरच्या चरणी दाळ -भात, पुरण-पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडला. यावेळी मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या १२ ज्योतिर्लिंगाचे झाकीचे दर्शन व आरती संपन्न झाल्यानंतर अनेकांनी दर्शन घेतले. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी सेक्रेटरी अनंतराव देवकते, सदस्य राजेश्वर चिंतावार, लक्ष्मणराव शक्करगे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, राजाराम झरेवाड, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, माधव पाळजकर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपीक बाबुरावजी भोयर, आदींसह गावकरी मंडळी उपस्थीत होते.

मंदिर विकासाची घौडदौड सुरूच राहणार.. महावीरचंद श्रीश्रीमाळ

गेल्या अनेक वर्षापासून येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला असून, दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वितरण, विविध सन उत्सवाला अनुसरून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच मंदिर परिसरातील विकास कामाची घौड दौड दर्शनार्थी भक्ताच्या देणगीतून सुरु आहे. आजवर मंदिराच्या विश्वस्त कमेटीच्या देखरेखीत नांदेड – किनवट राज्य रस्त्यावर भव्य अशी कमान, मंदिराचे प्रवेशद्वार, परिसरात चार व्यापारी दालन, लग्न सोहळे पार पाडावे यासाठी परमेश्वर मंगल कार्यालयाची निर्मित्ती, मंदिर परिसराचे सिमेंटीकरण, दर्शनार्थी भक्ताना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी शुद्ध पेयजल साठी आर. ओ. मशीन बसविण्यात आली आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून वाचकांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाचनालय, गोर गरिबांच्या सुख दुखासाठी अल्प दारात रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचे मन प्रसन्न व्हावे यासाठी कारंजे, विद्दुत रोषणाई, यासह मंदिराची रंगरंगोटी आणि इतर विविध प्रकारचे सुशोभीकरण करून मंदिराच्या संदर्यत भर टाकली असल्याची माहिती मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना दिली.

पोलीस निरीक्षक बी.डी.भूसुनूर यांनी केली बंदोबस्ताची पाहणी व श्री दर्शन

दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.डी.भूसुनूर यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. तसेच यात्रा उत्सव काळात भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, जमादार व पोलिस कर्मचार्यांच्या कडक बंदोबस्त लावला असून, १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत होणार्या, टवाळखोर्या, चोरी आदी घटनांवर नजर ठेवण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. तसेच आरसिपी प्लाटून २७ जणांचा बंदोबस्त हिमायतनगर ठाण्याचा सर्व स्टाफ व होमगार्ड असा एकूण ५७ जणांचा बंदोबस्त लावला आहे. वेळ प्रसंगी आणखी पोलिस कुमक मागविणार असल्याचे त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. त्यानंतर मंदिर परिसराची पाहणी करून श्री परमेश्वराचे दर्शन घेतले.
