नांदेड| अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महापराक्रमी,साऱ्या जगाने हेवा करावा असे सुराज्य निर्माण करणारे राजे शिवछत्रपती महाराज यांची जयंती उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र सोनकांबळे , संस्थेचे पदाधिकारी सिद्धेश्वर पाटील शेळके यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र कुमार शिंदे उपस्थित होते.