
मुखेड। मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना श्रावण कावडी या ऐतिहासिक स्थळास पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता घेऊन येथे सभागृह व कंपाउंड वॉल चे बांधकाम केले. यापुढेही भविष्यात येथील विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव बेटमोगरेकर म्हणाले.

श्रावण कावडी येथे श्रावणबाळ व त्यांचा आई वडिलाच्या मंदीराचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याचे भूमिपूजन मुखेड गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव बेटमोगरेकर यांच्या हस्ते दि. १९ रोजी करण्यात आले.

यावेळी कौशल्याबाई भीमराव पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बोनलेवाड,राजेश चौधरी, नरसिंग मामा बेतेवाड, सरपंच त्रिमुख हाक्के, माजी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, माजी नगरसेवक गोविंद घोगरे, , नामदेव हाक्के, सतीश खोचरे, हणमंत नारनाळीकर, हणमंत हाके,शेखर पाटील, ज्ञानेश्वर डोईजड, संदीप घाटे, साईनाथ बोईनवाड, संजय वाघमारे, कैलास ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले की, आई वडिलाची सेवा हीच ईश्वरसेवा सेवा असून आजच्या पिढीतील युवकांनी श्रावणबाळा सारखी आई वडिलाची सेवा करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर डोईजड यांनी केले तर यावेळी माजी सरपंच किशन हाके, विनायक हाके, शंकर नाईनवाड, संग्राम हाके, शंकर मामा, आनंद पोले, मारोती हाके, योगेश पाळेकर, भगवान गुंडावार, योगेश मामीलवाड, आनंद श्रीरामे, रामदास हाके, विशाल गायकवाड, सय्यद मुजीब, बालाजी हाके, आकाश पोतदार, संदीप मोटरगेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

या अगोदर श्रावणकावडी येथे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या वतीने सभागृह व कंपाउंड वॉल चे बांधकाम करण्यात आले आहे तर आ. डॉ.राठोड यांच्या वतीने विद्युत पोल चे काम करण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम चालू झाले असून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले.

