नांदेड| रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी जागृती सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव आनंद भोरगे सुप्रसिद्ध कलावंत बी. के. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रारंभी बहुजन प्रतिपालक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेण्यात आला. महाविद्यालयातील व्यवस्थापक विलास वाळकीकर, प्रा. विपिन कदम , प्रा. संजय नरवाडे , प्रा.अमोल धुळे , आदित्य कुंटे आदी उपस्थित होते.