
लोहा| लोहा शहराची भव्य शिवस्मारक व्हावे यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आंदोलन सुरु होते. अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले. परंतु शिवजयंती दिनी जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक माजी आ. रोहिदास चव्हाण-भाई धोंडगे यांचे चिरंजीव डॉ. प्रा. पुरुषोत्तम धोंडगे – माणिकराव मुकदम हे प्रमुख नेते मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्रित उपस्थित झाले होते.

कोणताही राजकीय विरोध वा आरोप प्रत्यारोप झाला नाही. पण एक मंगलमय ऐतिहासिक क्षनाचे हे सर्व साक्षीदार झाले. निमित्त होते लोह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण प्रसंगाचे. यात राजकीय टोलबाजी ..चिमटे ..होते..पण टोमणे व खोचरे नव्हते. एक आश्वासक राजकीय चित्र सर्वांच्या साक्षीने अनुभवायला मिळाले… प्रतापराव पाटील – रोहिदास चव्हाण यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होतात ते एकमेकांचे पारंपरिक विरोधक ,तर धोंडगे- चिखलीकर, यांचाही विरोध सर्वश्रुत आहे. चव्हाण – मुकदम यांच्यात ही विरोध शहर व मतदार संघाचे पाहिलाय. शिवजयंती रोजी पुतळा अनावरणाच्या निमिताने ही सर्व प्रमुख मंडळी व्यासपीठावर होती. वातावरण खेळीमेळीचे होते.

१९९२ पासून आपण एकमेकांच्या विरोधात लढतोय पण महिला पुढे करून राजकारण कधी केले नाही. अंतरिक दुःख होते की .कोणाला सांगावे अन कसे सांगावे ही मनातील उद्विग्नता प्रतापरावांनी जाहीरपणे मांडली. दंड- मांड्या थोपटणारे खूप आले अन गेले हे काही आमच्या साठी नवीन नाही पण असे राजकारण जनतेला पटत नाहि. या शहरात, गाडी घाली चालणाऱ्याना आपणच गाडी ओठतोय असे वाटायला लागले आहे. आपल्या धन्याला खुश करण्याचा हा प्रकार होय .गावात ज्याची पत नाही जेमतेम तीन हजार मतं घेणारे आव्हान देत आहेत. कोणीही उठसुठ वाटेल ते बोलत सुटलंय व आपली उंची कळली पाहिजे असा शब्दात प्रतापरावांनी समाचार घेतला. रोहिदास चव्हाण यांच्या उपस्थितीचा त्यांनी सन्मान केला. नगराध्यक्ष व टीमचे त्यांनी अभिनंदन केले १५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी पुतळाच्या संबंधाने सविस्तर भूमिका मांडली व पुतळा उभारण्याचे आपणास भाग्य मिळाले निवडणूक काळात जे आश्वासन दिले त्याची पूर्तता करू असे त्यांनी सांगितले.

माजी आ. रोहीदास चव्हाण यांनी पोवडा गायिका शिवरायांचे विचार अंगिकरावे असे सांगून शिवस्मारका उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. खुशाल पाटील पांगरिकर यांनी आम्हाला जागा दिली नाही पण नंतर ही जागा दिली असे आवर्जून सांगितले. कधी चिमटे तर कधी थेट नामोल्लख न करता त्यांनी भूमिका मांडली. चव्हाण-चिखलीकर- धोंडगे- मुकदम यांचे एकत्रित उपस्थिती अनेकांना सुखद धक्का देणारी होती. आगामी नव्या राजकीय समिकरणाची नांदी तर नव्हे ना (? ) याची चर्चा सुरु झाली. खा श्रुंगारे, शिवसेना उपनेते आनंदराव पाटील यांचे भाषण झाले. प्रास्ताविक माणिकराव मुकदम यांनी केले संचलन विक्रम कदम यांनी तर आभार नगरसेवक
भास्कर पवार यांनी केले.

आरंभी मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आतें कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी होते व्यासपीठावर खा सुधाकरराव शृंगारे माजी आ. रोहीदास चव्हाण शिवसेना उपनेते आनंदराव पाटील, जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, भाजपा प्रदेश सदस्य माणिकराव मुकदम प्रणिता ताई देवरे – चिखलीकर, चेअरमन खुशाल पाटील पांगरीकर, केशवराव मुकदम, दत्ता वाले, छत्रपती धुतमल,करीम तहसीलदार अशोक मोकले, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, भाजपा तालुकाध्यास आनंदराव शिंदे ,मिलिंद पवार, दीपक कानवटे, सचिन मुकदम यासह सर्व नगरसेवक विबिध पदाधिकारी होते. लोह्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रसंगी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सोहळा पार पडला.

