
वडगांव/पोटा, पांडुरंग मिराशे। कलियुगामध्ये वाढत चाललेली आराजगता पाहून समाजाच्या राष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीचा हितासाठी घातक ठरणाऱ्या घटना घडामोडी समाजात दिवसेन दिवस वाढत असून त्यामुळे समाजात अराजगता वाढत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत आहेत आपण दररोज वर्तमानपत्र मधून वाचता संस्कृती लोप पावत आहे तेव्हा आई वडील गुरु ज्येष्ठ मंडळीचा सन्मान करून समाज हितासाठी सातत्याने तरुण-तरुणी कार्य करीत राहावे की जेणेकरून आपल्या कार्याने समाजाला आई-वडिलांना आपले मान खाली न जाता ती स्वाभिमानाने ताट झाली पाहिजे असा सल्ला शिवपुराण कथेतून बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी उपस्थित हजारो महिला पुरुषांना उपदेश केला.

पोटा बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताहातील सात दिवस चालणाऱ्या शिवपुराण कथेतून उपस्थित हजारो भाविकांना ते मार्गदर्शन करीत आहेत आजच्या रूढी परंपरेला ,वाईट चाली रीतीला समाजातील बुवाबाजी ढोंगीपणा हुंडाबळी तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता यामुळे समाजाचे राष्ट्राचे देशाचे मोठे नुकसान होत आहे वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेकांना अल्प कालावधीत आपल्या आयुष्य संपवावे लागत आहे .

नाती सोडून समाजात वागणाऱ्या लोक जास्त झाल्यामुळे समाजातील दिवसेंदिवस संस्कार हरवत चालले आहे आई वडील गुरु ज्येष्ठ मंडळीचा आदर सत्कार न करता त्यांची हेळना होताना पहावयास मिळत आहे त्यामुळे समाजातील विषमता वाढत असून समाज नको त्या दिशेने भरकटच चालला आहे शिवपुराण हे रसायनशास्त्र असून संसारात अडकलेल्या जीवांना कसे जीवन जगावे हे शिवपुराण कथा सांगते.

सध्या रोग यांचा आयुर्वेदावर होमिओपॅथिक औषधी वर भरोसा नसून त्यांचा इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या गोळी औषधावर जास्त भरोसा आहे पण आयुर्वेदिक गेल्या अनेक वर्षापासून अनेक रोगावर रामबाण उपाय म्हणून त्याची ख्याती आहे मी निश्चित जीवनामध्ये त्याचा उपयोग करा व आपले सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी शिवाय पर्याय नाही. आयुर्वेदिक औषधाने अनेक रोगांचा नायनाट होतो यात शंका नसल्याचे शिवपुराणकार परमपूज्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्य जी यांनी आपल्या कथेतून हजारो भावीक भक्तांना उपदेश केला.

