अर्धापूर, निळकंठ मदने। येथील पोलिस ठाण्याचे नवे ठाणेदार म्हणून पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांची नियुक्ती करण्यात आली असून, नव्याने पोलिस निरीक्षक पदाचे सुत्रे हाती घेतलेले हनुमंत गायकवाड यांची नांदेड येथे बदली झाली आहे. दुसऱ्यांदा अर्धापूर तालुक्यात पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. कडक शिस्तिचे अधीकारी म्हणून अशोक घोरबांड यांची ओळख आहे.
अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी येथे उकृष्ठ काम केले. यांची जिल्ह्यात आठ वर्षं सेवा झाल्याने जिल्हा बदलीत अमरावती येथे बदली झाली. त्यामुळे हादगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाल्याने त्यांनी पदभार स्वीकारला होता. दरम्यान हनुमंत गायकवाड यांची उपविभागीय अधिकारी म्हणून प्रमोशनसाठी सर्व माहिती सबंधीताकडे पाठविली आहे, त्यामुळे एका वर्षात त्यांचे प्रमोशन आहे. अनुभवी अधीकारी म्हणून हनुमंत गायकवाड यांची ओळख आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी बाळापूर, हटृटा,कोतवाली,पोलिस ठाणे परभणी, ग्रामीण नांदेड येथे अप्रतिम काम केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात आगळ्या वेगळ्या खुनाचा प्रकरणाचा छडा लावला होता. कडक शिस्तप्रिय अधीकारी म्हणून अशोक घोरबांड यांची पोलिस खात्यात ओळख आहे. अर्धापूरात बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर लागलेले फळांचे गाडे, भाजीगाडे, अवैध दारु विक्री,मटका,रेती माफिया, जुगार अड्डडे ,शिस्तहीन वाहतूक यांचे तगडे आव्हान आहे. याकडे अशोक घोरबांड कसे काम करतात याकडे लक्ष लागले आहे.