
नविन नांदेड। सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्ताने नांदेड केसरी भव्य कुस्त्यांची दंगल कै.गोविंदराव दतरामजी पाटील काळे यांच्या स्मरणार्थ १९ फेब्रुवारी रोजी लुटे मामा चौक जुना कौठा नांदेड येथे संपन्न झाली ,यावेळी प्रथम कुस्ती मानकरी भैरवनाथ जोगी परभणी हे पहेलवान विजयी ठरले त्यांना कै.गोविंदराम पाटील काळे यांच्या स्मरणार्थ ३१ हजार रोख व चांदीचीगदा यांना नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने प्रथमच नांदेड केसरी भव्य कुस्ती दंगल आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक पहेलवांनी सहभाग नोंदविला,आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुस्ती दंगल शुभारंभ करण्यात आला. या कुस्ती मध्ये प्रथम पारितोषिक ३१ हजार व चांदीची गदा, मनपा नगरसेवक राजू पाटील काळे, यांच्या कडून पहेलवान भैरूनाथ जोगी परभणी,व्दितीय माजी नगरसेवक राजूभाऊ गोरे २१ हजार, पुणे येथील रविराज निंबाळकर तर तिसरी ११ हजार विठ्ठलराव काकडे माळकरी कौठेकर यांच्या स्मरणार्थ पुणे येथील समाधान गोरड पहेवलांनी पटकाविले,तर ईतर अनेक पारितोषिके कुस्ती दंगल मधील झालेल्या अनेक कुस्ती मध्ये पटकविली व आ.मोहनराव हंबर्डे यांनी लावलेल्या मानाचा कुस्तीचा मानकरी नागेश नारायण लुटे हा ठरला , तर दरवर्षी शंकर नागरी सह पतसंस्थेच्या वतीने माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी ११ हजार रोख रूपयांची तर चैतन्य बापु देशमुख यांनी ५०००/ हजार रुपये धनादेश दिला. या दंगली मध्ये दुसरा विजेता पुणे येथील रविराज निंबाळकर तर तिसरा विजेता समाधान गोरड हा झाला ,हि दंगल पारदर्शक व अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चुरशीच्या लढतीत झाली.

या कुस्तीदंगल मध्ये पंच म्हणून योगेश मुंडकर, विठ्ठल पाटील पुयड, मारोती तेलंग,जगन्नाथ पाटील टरके,चक्रधर पाटील शिंदे, बालाजी वडजकर,बारी पेहलवान खुरगाव, संभाजी पाटील कदम,दिंगाबर आवातिरक, राहुल डोईफोडे,बबन पेनुरकर,राजु दळवी यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्यासह हारियाणा राज्यातील पहेलवान मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या विभागातुन व अनेक जिल्ह्यांतील जालना, औरंगाबाद, पुणे, नांदेड हिंगोली व विविध जिल्ह्यांतील नामांकित पहेवलवान यांनी कुस्ती दंगल मध्ये सहभाग नोंदविला, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, चैतन्य बापु देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, गंगाप्रसाद काकडे,संतुकराव हंबर्डे, बाळु पाटील तिडके, संरपच बाळु पाटील ,तुलजेश यादव,मारोतराव बनसोडे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.

महाराष्ट्र राज्य गोल्ड मेडिलिसट पै. कुं.प्रणाली विठ्ठलराव पुयड ,पै नागेश नारायण पाटील यांच्यी प्रामुख्याने ऊपस्थिती होती,सुत्रसंचलन भालचंद्र रणशुर यांनी केले,या कुस्ती दंगल ची आयोजक सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील लुटे, महेंद्र पाटील काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पैलवान अशोक पाटील जाधव, पहेलवान रामभाऊ काळे व समस्त गावकरी मंडळी जुना कौठा, असरजन यांनी केले होते, यावेळी शहरी व ग्रामीण भागातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी तीन वाजता सुरू झालेली कुस्त्यांची दंगल रात्री अकरा वाजता संपन्न झाली यावेळी धाराशिव येथील हालगी वादक ऊपसिथीत होते, अनेक कुस्ती चितथराक,प्रेक्षणीय व वेगवेगळ्या डावपेच खेळत कुस्ती जिंकली. या कुस्ती दंगल यशस्वी होण्यासाठी महेंद्र काळे, मारोती गोरे, रामा काळे, अशोक पाटील, टरके पाटील, तेलंग पाटील ,मारोती काकडे, मारोती धुमाळ,बबन गाडवे, वैजनाथ काकडे व मित्र परिवाराने सहकार्य केले.

