
नांदेड| व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र कुलकर्णी तर कार्याध्यक्षपदी राजपाल चिखलीकर यांयी निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पत्रकारांचे संघटन मजबूत करुन त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याचे काम व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यात संघटन बांधणी सुरू आहे. नुकतीच जिल्हा व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले,महानगर अध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांनी कार्यकारणी जाहीर केली.

जिल्हाउपाध्यक्ष पदी रवींद्र कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी राजपाल चिखलीकर, महानगर उपाध्यक्षपदी सुर्यकुमार यन्नावार, महानगर उपाध्यक्षपदी प्रमोद चौधरी, सरचिटणीसपदी शेख मुजीब, सरचिटणीसपदी ऋषिकेश कोंढेकर, कोषाध्यक्षपदी स्वप्निल गायकवाड, कार्यवाहकपदी भास्कर जामकर, संघटकपदी प्रल्हाद आयनले,प्रसिध्दी प्रमूखपदी रमेश चित्ते, सदस्य म्हणून छाया नागरथवार यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच उर्वरीत कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याचे महानगर अध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांनी सांगितले.

