
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच माहूरच्या वतीने बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 11.45 वाजता स्थानिक बालाजी मंगलम येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक सिद्धार्थ तामगाडगे,डॉ.सत्यम गायकवाड यांनी दिली आहे.

समाजातील पालकांना एकाच वेळी एकाच ठिकाणी वधू-वर संशोधन करणे सोयीचे जावे या हेतूने माहूर शहरात बौद्ध समाजाचा मराठवाडा विदर्भस्तरीय वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विवाह योग्य वधुवर यांची संपूर्ण माहिती असलेली ते पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे.या बौध्द वधू- वर परिचय मेळाव्याच्या समजोपयोगी कार्यात उत्सुक्तपने सहभाग घ्यावा असे अहवान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच माहूरच्या वतीने

संयोजन समितीचे अध्यक्ष शंतनू कांबळे,उपाध्यक्ष आदित्य खंदारे,सचिव राहुल नरवाडे,कोषाध्यक्ष निकेत इंगोले,सह कोषाध्यक्ष सुगत नगराळे,संघटक रत्नदीप पाटील, कार्याध्यक्ष मनोज तामगाडगे, सह सचिव दत्ता कांबळे,सहसंघटक प्रतीक कांबळे,निमंत्रक दीपक पाटील,सदस्य सुरेंद्र शेंडे,केशव भगत आयोजक सिद्धार्थ तामगाडगे,डॉ.सत्यम गायकवाड यांनी दिली आहे.विशेष म्हणजे गत वर्षी बौध्द वधू- वर परिचय मेळाव्यातून २० लग्न सुद्धा जुळले होते.त्या मुळे वेळेची व पैशाची बचत झाली होती.

