
नवीन नांदेड। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड,शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुळयास अभिवादन करून आमदार मोहनराव हंबर्डे व पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत भगवी झेंडा दाखवून भव्य मिरवणूक काढण्यात आली, व शिवजन्मोत्सव समिती वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिवजन्मोत्सव निमित्ताने सिडको हडको परिसरात विविध ठिकाणी अन्नदान,फळे व पाणी वाटप विविध व्यापारी प्रतिष्ठाणाचा वतीने आयोजन करण्यात आले होते.दुपारी हडको येथून होणार मुख्य मार्गवर निघून जिजाऊ सृष्टी येथे मिरवणूक विसर्जन होणार आहे, यात विविध शाळेच्या लेक्षीम पथकाचा व पारंपरिक वाघवृंद पथकाचा सहभाग राहणार आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निबंध सामान्य ज्ञान , रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, महिलांसाठी बकीट मध्ये बाल टाकणे , संगीत खुर्ची स्पर्धा महिलांसाठी वकृत्व स्पर्धा २१ व्या शतकातील महिलांची आवाहने वर आयोजित करण्यात आली बक्षीस वितरण नंतर तर १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.मिरवणूकीचे शुभारंभ मा.शिवश्री आ.मोहनराव हंबर्डे,मा.शिवश्री सिद्धेश्वर मोरे पोलिस उपाधिक्षक,ईतवारा नांदेड, प्रमुख उपस्थिती शिवश्री अशोक घोरबांड ग्रामीण पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीचे उद्घाटन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व अभिवादन करून मान्यवरांच्या उपस्थितीत भगवा झेंडा दाखवून केले, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे,प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नगरसेवक राजू पाटील काळे, माजी नगरसेवक डॉ.करूणा जमदाडे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,राजु लांडगे,प्रा.मधुकर गायकवाड,सतिश बसवदे, संजय पाटील घोगरे,वृक्षमित्र मोहनराव घोगरे यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथी होती.

यावेळी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान, रांगोळी, निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले,तर लेझीम पथक मध्ये इंदिरा गांधी हायस्कूल, छत्रपती शिवाजी हायस्कूल हडको यांच्या सह अनेक शाळेच्या सहभाग होता,तर पारंपारिक वाघवृंद बड पथकाने गिते सादर केले,तर सिडको हडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवजन्मोत्सव निमित्ताने रोषणाई करण्यात आली होती, शिवजन्मोत्सव निमित्ताने सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले, ग्रामीण भागातील अनेक व शिवभक्तांनी दोन्ही पुतळा परिसरात दुचाकी मोटार सायकल रॅली काढून अभिवादन केले.परिसरात विविध भागात शिवजन्मोत्सव निमित्ताने पताके, झेंडे यांनी परिसर भगवामय झाला होता. विविध सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले,वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष विनोद कांचनगिरे व पदाधिकारी यांनी केले, उध्दव ठाकरे शिवसेना वतीने जितुसिंग टाक, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल उगवे, महिला आघाडीच्या निकीता शहापुरवाड,सतिश खैरे, निवृत्ती जिंकलवाड, कृष्णा पांचाळ यांनी अभिवादन केले.

भव्य मिरवणूक सोहळा यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, तर सिडको हडको परिसरातील विविध भागात व मुख्य रस्त्यावर शिवाजी चौक येथे माधव पाटील ढाकणीकर व हपी फिटनेस सिडको चा वतीने अन्नदान, हडको येथे प्रकाश घोगरे, पाटील पान शाप,वाघाळा दता घोगरे,वृक्षमित्र मोहनराव पाटील घोगरे, सिडको येथे साई कामपलेकस व्यापारी मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अन्नदान वाटप केले होते. शिवजन्मोत्सव निमित्ताने सिडको हडको परिसारासह ग्रामीण भागात ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

