
नवीन नांदेड। नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शाखा सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सिडको टिन शेड येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या कडून शालेय साहित्य व मिठाई वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

शिवजन्मोत्सव निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता उपस्थित मान्यवराचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले , यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष संग्राम मोरे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शाम जाधव कोषाध्यक्ष निळकंठ वरळे, कार्यध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, वृत्तपत्र संघटनेचे सतिश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे, जेष्ठ वितरक शेख सयोधदीन, दौलतराव कदम, मदनसिहं चौहाण,

महिला वितरक वंदना लोणे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर गायकवाड, लोकमत वितरणचे संजय कुमार गायकवाड,सुधाकर काकडे,रत्नाकार लांडगे व वृत्तपत्र विक्रेता यांच्यी उपस्थिती होती. यावेळी सामाजिक बांधिलकी जोपसत शिवजयंती निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता पाल्लयांना शालेय साहित्य वाटप आदर्श उपक्रम असल्याचे सांगितले.

