
नवीन नांदेड। पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज, संत गुरू रविदास महाराज,संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त ” वाचक मेळावा ” १९ फेब्रुवारी २३ रोजी पार पडला.

या वाचक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर तर प्रमुख पाहुणे रासपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजीराव इंदुरे, निवृत्त अधिकारी मा.केरबा जेटेवाड,मा.सरपंच निळकंठ उराडे, डॉ.गणपत जिरोनेकर, डॉ. दिनेश पवार यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात याच महिन्यात सेवा निवृत झालेले अभियंता मा. ब्रह्मानंद माने नंदगावकर तसेच ८नोव्हेबंर २०२२ ला जेजूरी येथिल कार्यक्रमात ” सत्यशोधक प्रबोधनकार” पुरस्कार मिळालेले या ग्रंथालयाचे संस्थापक व राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना गोविंदराम म्हणाले,मी तुमच्यातलाच सामान्य कार्यकर्ता आहे. आमच्या वडिलांचे गुरू संत गाडगेबाबा यांच्या विचारा मुळे आमच्या घरात परिवर्तनाला सुरूवात झाली, पुढे सर्व संत व महापुरूषांच्या अभ्यास केला व समाज रूतूपर्ण फेड म्हणून महापुषाची विचारधारा तळागाळातील माणसांपर्यंत घेवून जाण्याचे कार्य सुरू ठेवले, आक्टोबंर मध्ये मला धुळेवरून मौर्य क्रांती महासंघाचे राज्यअध्यक्ष राजीव हाके यांचा फोन आला . तुमची पुरस्कारांसाठी निवड केली आहे.

आणि आठ दिवसानी या संघाचे संस्थापक अध्यक्ष बलभिम मारिले सर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाच घेवून घरी आले, माझ्या स्वप्नातही नव्ह्ते हा पुरस्कार मला मिळेल. तो मला मिळाला आहे. हे सातत्त्य ठेवून समाज परिवर्तनाचे कार्य केल्याचे फळ आहे. या मुळे माझ्यावर समाज रुण परत फेड करण्याची जिम्मेदारी वाढली आहे ,ती मी पार पाडणारच, हे माझ्यातल्या वाचन संस्कृती मुळेच घडले आहे.या साठी सर्वांनी वाचन संस्कृती वाढवावी व या पुढेही अशीच आपली साथ हवी आहे असे प्रतिपादन केले.

अध्यक्षिय भाषणात डॉ.स्वामी म्हणाले, हा योग्य वेळी योग्य माणसाला मिळालेला सन्मान आहे,मी यांना पंचविस वर्षांपासून ओळखतो, नौकरी – घर सांभाळून पुर्ण वेळ निस्वार्थ पणे समाज कार्य करीत असतात, समाज प्रबोधना बरोबरच लेखक,कवी पण आहेत.आज ही वयाच्या सत्तरव्या वर्षी ते राज्यच नाहीतर देशपातळीवर त्यांचे कार्य चालू आहे, त्यांच्या कार्यातुन हजारो कार्यकर्ते निर्माण झालेले दिसुन येतात, समाजांनी प्रबोधनकार गोविंदराम यांचे विचार आचरणात आणणे हेच खरे त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठरतील असे विचार मांडले, आपण सर्वजण वाचन संस्कृती वाढविण्यासाठी स्वतः व मुलांना वाचनालयाचे सदस्य बनवावे असे सांगितले. कार्यक्रमांचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी केले होते, तर ग्रंथपाल मदनेश्वरी देवकते यांनी सर्वांचे आभार मानले.

