
नांदेड| कंधार भाग हा डोंगराळ आहे येथील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्व सोयी व सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध राहिल व प्रतिपादन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.

ते कळका ता.कंधार येथे ग्राम विकास शिक्षण संस्था चिखली संचलित सुभाषराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. नूतन इमारतीचे भूमिपूजन माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे ठाकूर,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. प्रणिता देवरे चिखलीकर माजी जि प सदस्य मनोहर पाटील तेलंग,प्रदेश सदस्य भाजपा बापूराव केंद्रे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार अनुप सिंह यादव, विभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, माजी जि प सदस्य बाबुराव गिरे, जेष्ठ विधीज्ञ बीके पांचाळ, महादेव मुसळे, गिरीधारी केंद्रे, गोविंद शिंदे, व्यंकटराव गायकवाड, सुनंदा गादेकर, बालाजी झुंबाड, माधव मुंडे,कालींदा शिंदे,सुमन गायकवाड,विलास गायकवाड, गोविंद गायकवाड,किशन केंद्रे, शेषराव, काशिनाथ टोम्पे, नारायण कागदेवाड, उत्तमराव गायकवाड साऊजी गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पुयड यांच्यासह अनेक गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामविकास शिक्षण संस्था चिखलीचे सचिव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले तर आभार साहेबराव गायकवाड यांनी केले.

