
हिमायतनगर। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कडून 21 फेब्रुवारी पासून घेण्यात येत आहेत. 21फेब्रुवारी ला इंग्रजी या विषयाचा पेपर झाला. सदरील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 (A) मध्ये चुका आढळुन आल्या आहेत. यातील उपप्रश्न 3(A) मध्ये A-3 हा प्रश्नच दिलेला नाही. तसेच A-4 हा सुद्धा प्रश्न दिलेला नाही. याउलट इथे उत्तरच दिलेले आहे. तर A-5 या प्रश्नाचे काय उत्तर लिहायचे अशी सूचना दिली नाही. हे तिन्ही प्रश्न एकुण 6 गुणांचे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

सदरील प्रश्नांचे विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. तर सदरील प्रश्नांचे सरसकट गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावेत अशी मागणी मंडळात होणाऱ्या नियमकांच्या बैठकीत करणार आसल्याचे हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्रा. कागणे आर. एस. यांनी सांगितले.

