
नांदेड/उमरी| अविकसित मराठवाडा विकासाचा पाठपुरावा करतांना महाविकास अगदी सरकारच्या माध्यमातून करोडोचा विकास निधी मजूर करून आणला यातून नांदेडच नव्हे तर मराठवाडा विकासात नं. 1 रहावे असा प्रयत्न होता असे प्रतिपादन माजी मुख्यमुंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

निळा ते बासर तेलंगना सिमेंपर्यंत जाणारा महत्त्वकांक्षी रस्ता प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली असून या प्रकल्पाचे काम सुरु झाल्यामुळे रस्ता विकास कामांचे शिल्पकार अशोकराव चव्हाण यांचे आभार मानण्यासाठी धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे 20 फेब्रुवारी रोजी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच याच कार्यक्रमात शिक्षक मतदार संघातून नुकतेच विजयी झालेले आ. विक्रम काळे याचा यावेळी नागरी सत्ताकार करण्यात आला .

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खा. भास्करराव पाटील खतगांवकर तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. माधवराव पाटील जवळगावकर ,आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,शिवसेना ठाकर गटाचे जिलाध्यक्ष बबन बारसे शेतकरी नेते व उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरुजी,बंडू चव्हाण ,जिल्हापरिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके,नायगावचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण , संजय कुलकर्णी ,उमरी पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष बापुसाहेब गोरठेकर, श्रीराम जगदंबे, प्रल्हाद पाटील ढगे, बापूसाहेब कौडगावकर, बालाजी पाटील कारेगावकर, गंगाधर तोडलोड, शाम पाटील चोळाखेकर, माधवराव पाटील सिंगनापूरकर, नागभूषण वर्णी, रामचंद्र रेड्डी, हणमंत जगदंबे, भाऊसाहेब गोरठेकर, लिंगूराम कवळे, दिगांबर लखमावार, सूर्यकांत पाटील जुन्नीकर, ताहेर पठाण, शेख जावेद, निलेश पाटील बाळापूरकर, मुदखेडचे तालुकाध्यक्ष उद्धव पवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, पायाभूत सुविधासह विकासात अग्रेसर रहावे या विचारांतूनच काम करण्यात आले देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ते नरसिंहराव यांच्या सरकारच्या कारकिर्दीत शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे दोनदा मुख्यमंत्री तर देशपातळींवरील सर्वोच पदापर्यंत पोहचत शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी ठेवत विकासाला गती देण्यात आली तीच परंपरा घेऊन विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नांदेडच नव्हे तर मराठवाड्याच्या विकासासाठी पाठपुरावा केला यावेळी तत्कालीन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत विकास कामना सदैव ग्रीन सिग्नल दाखवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना माजी मंत्री भास्करराव पाटील म्हणाले की, डॉ.शंकरराव चव्हाण यांनी इसापूरच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात पाणी आणले. त्यामुळे मुदखेड, अर्धापूर हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला. कॅनॉलचे किरकोळ काम संपल्यानंतर हेच पाणी उमरी, धर्माबाद परिसरातसुद्धा येणार आहे. शंकरराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशोकराव चव्हाण काम करत आहेत. त्यांना समर्थ साथ देण्यासाठी सगळ्यांनी कटीबद्ध झाले पाहिजे. असे सांगतानाच राजकारणातील अनेक जून्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला.

विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून विजयी झालेले विक्रम काळे यांचा आज नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारास उत्तर देताना ते म्हणाले की, 2024 ची वाट पहा. योग्य ठिकाणी बटन दाबा. राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण हेच करणार आहेत. असा माझा ठाम विश्वास आहे. यावेळी आ.माधवराव पाटील जवळगावकर, आ.जितेश अंतापूरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे, राष्ट्रवादीचे शिरीष गोरठेकर यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचलन संतोष पांडागळे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्रीराम जगदंबे यांनी मानले.

खासदारांनी गोरठ्याचा अंडरब्रिज तरी करुन दाखवावा – राजूरकर
एका बाजूस राज्याचे नेते अशोकराव चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यांच्या प्रयत्नातून समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग असेल किंवा ज्याचे नुकतेच काम सुरू झाले आहे तो निळा जंक्शन ते बासर राज्यसीमा मार्ग असेल ही सर्व कामे अशोकराव चव्हाण यांनी केली. या सोबतच सीमालगतच्या गावांसाठी 192 कोटी रुपये मंजूर करुन घेतले. या कामांना शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ती कामे रेंगाळली आहेत. उलट उठसुट अशोकराव चव्हाण यांच्यावर टिका करणारे जिल्ह्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी आणखी विकासाचे एकही नारळ फोडले नाही. त्यांनी कमीत कमी केंद्र शासनाच्या आखत्यारित असलेल्या रेल्वे विभागाचा गोरठा येथील अरुंद असलेल्या अंडरब्रिजचे काम तरी करुन दाखवावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले.
